Vasai Virar election seat reservation 2022 : वसई विरार महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर! कोणता वॉर्ड कुणासाठी आरक्षित? वाचा
Vasai Virar Municipal Corporation : त्रिसदस्यीय प्रभाग रचने नुसार ओबीसी आरक्षणाशिवायच 42 प्रभागातील आरक्षण सोडत काढण्यात आली.
वसई-विरार : वसई विरार महापालिकेच्या (vasai virar corporation) सार्वत्रिक निवडणुकीचे (election)अडीच वर्षा नंतर बिगुल वाजलंय. महापालिकेच्या प्रभाग रचनेची आरक्षण सोडत अखेर निघाली. त्रिसदस्यीय प्रभाग रचने नुसार ओबीसी (obc) आरक्षणाशिवायच 42 प्रभागातील आरक्षण सोडत काढण्यात आली. त्रिसदस्य नुसार वसई विरार महापालिकेत 42 प्रभागात 126 नगरसेवकांची संख्या आहे. आज आरक्षण सोडत झाल्या नंतर 1 जून ते 6 जून पर्यंत आरक्षण सोडतीवर हरकती घेण्याची मुदत देण्यात आली आहे. मागच्या निवडणुकीत 115 वॉर्डचे 115 नगरसेवक होते.
वसई-विरार महापालिकेच्या आजच्या आरक्षण सोडतीत एकूण 42 प्रभाग असून 126 सदस्य संख्येसाठी ही आरक्षण सोडत झाली. यात 50 टक्के महिला आरक्षण असून 126 पैकी 63 महिला सभागृहात प्रतिनिधित्व करणार आहेत. या महिला सदस्य संख्येत 3 अनुसूचित जाती, 3 अनुसूचित जमाती आणि 57 सर्व साधारण महिला असणार आहेत. तर 42 प्रभागांपैकी 5 प्रभाग हे अनुसूचित जाती, 6 प्रभाग अनुसूचित जमाती आणि 115 प्रभाग हे सर्वसाधारण असणार आहेत.
मागच्या निवडणुकीतील संख्याबळ
बहुजन विकास आघाडी 107 बविआ पुरस्कृत अपक्ष 01 शिवसेना 05 भाजपा 01 मनसे 01 एकूण – 115
पालिकेचं नाव : वसई-विरार
अशी निघाली सोडत
अनुसूचित जातीसाठी 5 जागा राखीव. त्यापैकी महिलांसाठी तीन जागा राखीव आहेत.
अनुसूचित जमातीसाठी 6 जागा राखीव असून महिलांसाठी 3 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
सर्वसाधारण वर्गासाठी 115 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी 57 जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत.
अनूसचित जातीसाठींचे राखीव प्रभाग
प्रभाग 11-अ, 20- अ, 28- अ, 29-अ, 30-अ
अनुसूचित जमाताीसाठींचे राखीव प्रभाग
1- अ, 3- अ, 28-ब, 33-अ, 36-अ, 42-अ
सर्वसाधारण (ओपन कॅटेगिरी)
एकूण जागांची संख्या – 115 पैकी महिलांसाठी आरक्षित जागा – 57
वसई विरार पालिकेचं सध्याचं पक्षीय बलाबल काय?
1. वसई-विरार –
बविआ – 107 शिवसेना – 05 भाजप – 01 मनसे – 01 एकूण – 115