वसंत मोरे यांचा ठाकरे गटात प्रवेश; वंचितचे कार्यकर्ते संतापले, दिला जाहीर इशारा
वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. यामागे आगामी विधानसभा निवडणूक असल्याचे सांगण्यात येत आहे. ठाकरे गटाकडून पुणे मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक वसंत मोरे लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोणत्याही परिस्थितीत पुणे लोकसभा निवडणूक लढविणारच असा चंग मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी बांधला होता. महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. शरद पवार यांची त्यांनी भेटही घेतली होती. मात्र, ही जागा कॉंग्रेसकडे गेल्याने येथून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळविली होती. पण, त्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. वसंत मोरे यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांच्या या निर्णयामुळे नाराज झालेल्या वंचित कार्यकर्त्याने त्यांना जाहीर इशारा दिलाय.
वसंत मोरे यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते होते. लवकरच वसंत मोरे शिवसेन ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. यामागे आगामी विधानसभा निवडणूक असल्याचे सांगण्यात येत आहे. ठाकरे गटाकडून पुणे मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक वसंत मोरे लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, यामुळेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संतापले आहेत.
पुण्यातील हडपसर येथील वंचितच्या सरोदे नावाच्या कार्यकर्त्याने वसंत मोरे यांना जाहीर इशारा दिला आहे. सरोदे यांनी पुण्याच्या मोरे बागेत असलेले वसंत मोरे यांचे कार्यालय फोडण्याचा जाहीर इशारा दिला आहे. वंचितमुळे लोकसभा निवडणूक लढविली आणि पराभूत झाल्यानंतर पक्ष सोडल्यामुळे हा कार्यकर्ता संतापला आहे. सरोदे याच्या या जाहीर इशाऱ्यानंतर पोलिसांनी वसंत मोरे यांच्या कार्यालयाजवळ बंदोबस्त वाढविला आहे.
वसंत मोरे हे मनसेकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. पुणे लोकसभा निवडणूक लढविण्याची त्यांनी तयारीही केली होती. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठकारे यांनी लोकसभा निवडणूकीत भाजपला जाहीर पाठींबा देत निवडणूक न लढण्याचा निअर्न्य जाहीर केला. त्यामुळे वसंत मोरे यांनी शरद पवार यांच्याशीही संपर्क साधला होता. मात्र, ऐनवेळी त्यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन उमेदवारी मिळविली होती. त्यांच्या उमेदवारीचा भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी धसका घेतला होता.