Vasant More: …आणि वसंत मोरेंनी राज ठाकरेंचे पायच धरले! फेसबुक पोस्ट करत काय म्हणाले मोरे?
Vasant More Raj Thackeray Meet: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासोबत वसंत मोरे यांनी राज ठाकरेंसोबत महत्त्वपूर्ण चर्चाही केली. राज ठाकरेंच्या पत्नीसोबतही चर्चा करताना फोटो वसंत मोरे यांनी शेअर केला आहे.
मुंबई : वसंत मोरे! (Vasant More) हे नाव तसं गेल्या काही दिवसांत कमालीचं चर्चेत आलं. मनसेचे शहराध्यक्ष असलेल्या वसंत मोरेंना शहराध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं. त्यांच्या जागी जबाबदारी साईनाथ बाबार यांच्याकडे देण्यात आली. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) गुढीपाडव्याला केलेल्या भाषणानंतर भोगेंविरुद्ध हनुमान चालीसा वाद गाजला. त्याचे पडसाद पुण्यात उमटले. राजकीय वातावरण तापलं. वसंत मोरेंना शहराध्यक्ष पदावरुन काढल्यानंतरही त्यांनी आपण मनसेच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. मशिदींवर भोंग्यांना मनसेनं हनुमान चालिसेनं उत्तर दिलं. वसंत मोरेंनी भोंग्याच्या भूमिकेवरुन मात्र सगळ्यांचं लक्ष वेधलं. राजकारण तापत गेलं. दरम्यान, वसंत मोरेंच्या नावाची चर्चा राजकीय अनुशंगानं होत राहिली. अशातच वसंत मोरेंनी आपलं मनसे प्रेम कायम ठेवलं. अखेर थेट राज ठाकरें यांनी भेटीसाठी वसंत मोरे यांनी बोलावलं. सोमवारी ही भेट झाली. त्यानंतर वसंत मोरेंनी फेसबुक पोस्ट (Vasant More Facebook Post) लिहित राज ठाकरेंच्या पाया पडतानाचा फोटोही शेअर केला.
फेसबुक पोस्टमध्ये काय म्हणाले वसंत मोरे?
आयुष्यात खूप पद मिळाली, ती ही कामाच्या आणि ऐकनिष्ठेच्या जीवावर, पद काय आज आहे उद्या नाय ओ… पण माझं जे स्थान “माझा वसंत” हे जे काही काळासाठी डळमळीत झालं होतं, पण तिथं गेल्यावर (शिवतीर्थावर) समजले आरे इथे तर मी काहीच हरवले नाही, उगाचाच भीतीने पोटात गोळा आला होता म्हणूनच मी म्हणतो मी आपला इथेच बरा…
पाहा वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट
मनसे आशीर्वादानंतर चर्चा काय?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासोबत वसंत मोरे यांनी राज ठाकरेंसोबत महत्त्वपूर्ण चर्चाही केली. राज ठाकरेंच्या पत्नीसोबतही चर्चा करताना फोटो वसंत मोरे यांनी शेअर केला आहे. शर्मिष्ठा ठाकरे यांनीही वसंत मोरेंसोबत बातचीत केली आहे. राज ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरे यांनी आपली भोंग्यावरची भूमिकाही स्पष्ट केली. लोकप्रतिनिधी म्हणून मांडलेल्या भूमिकेवर मी आजही ठाम असल्याचं त्यानी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं होतं.
पाहा राजभेटीनंतर काय म्हणाले वसंत मोरे?
ठाण्यातील उत्तर सभेकडे लक्ष
दरम्यान, आता संपूर्ण राज्याचं लक्ष हे 12 एप्रिलच्या राज ठाकरेंच्या उत्तर सभेकडे लागलंय. या सभेत राज ठाकरे पुन्हा एकदा वेगवेगळ्या मुद्द्यांवर काय भाष्य करतात? शिवसेनेच्या केलेल्या प्रतिउत्तरावर काय म्हणतात? भाजपसोबत जाण्याच्या शक्यतेवर आपली काय भूमिका स्पष्ट करतात, हे पाहणं महत्त्वाचंय.
इतर राजकीय बातम्या :
Anil Parab : कामगारांकडून उकळलेला पैसा बाहेर निघणार का?, अनिल परब म्हणतात…
Sanjay Raut : काश्मीर फाईलवाल्यांनी आता “भाग सोमय्या भाग” हा सिनेमा काढावा, राऊतांचा खोचक टोला
Ola-Uber : ‘उबेर’चा प्रवास 12 टक्क्यांनी महागला, उबेर-‘ओला’च्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी