मुस्लिम आरक्षणासाठी 5 तारखेला विधान भवनावर मोर्चा, वंचितच्या साथीला रझा अकादमी मैदानात, प्रकाश आंबेडकर यांची घोषणा
मुस्लिम आरक्षणासाठी सरकारविरोधात येत्या 5 जुलैला विधानभवनावर भव्य मोर्चा काढणार असल्याचं वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. (VBA And Raza Academy Morcha Vidhan bhawan Demand muslim Reservation Prakash Ambedkar)
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, पण मुस्लिम आरक्षणबाबत आणखी निर्णय झाला नाही. सेक्युलर म्हणणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी अजून मुस्लिमांना आरक्षण (Muslim Reservation) दिलं नाहीय. सरकारविरोधात येत्या 5 जुलैला विधानभवनावर भव्य मोर्चा काढणार असल्याचं वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सांगितलं आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (VBA And Raza Academy Morcha Vidhan bhawan Demand muslim Reservation Prakash Ambedkar)
मुस्लिम आरक्षणासाठी येत्या 5 तारखेला विधान भवनावर मोर्चा
मुस्लिम समाजाला सुद्धा 5 टक्के आरक्षण लागू करायलं हवं. कोर्टाने मराठा आरक्षण बाबत निर्णय दिला, पण मुस्लिम आरक्षण बाबत आणखी कोणताही निर्णय झाला नाही. सेक्युलर म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी अजून मुस्लिमांना आरक्षण दिलं नाही. सरकारविरोधात येत्या 5 जुलैला विधान भवनावर मोर्चा काढणार आहे. यात वंचित बहुजन आघाडीसह रजा आकदमी मैदानात असेल, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
कोव्हिडची परिस्थिती सध्या भीषण बनत चाललीय. एकापाठोपाठ एका लाटा येत आहे. पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही मोर्चा काढणार आहोत. मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण कोर्टाने मान्य केलं आहे, सरकारने आता जाहीर करावं, अशी आग्रही मागणी आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली. पदोन्नती आरक्षणाबाबत बाबत वाद सुरू आहे. एम्पिरिकल डाटा सरकारला जमा करावा लागेल, असंही आंबेडकर म्हणाले.
भाजपचं दंग्याचं राजकारण लोकांच्या लक्षात आलंय, सरकारने कायदा करावा
भाजपचं राजकारण लोकांच्या लक्षात आलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये दंगा होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. हिंदू मुस्लिमांना भडकवलं जात आहे. आता खरंच दंगा भडकवणाऱ्या व्यक्तीविरोधात कायदा होणं गरजेचं आहे. दोन धर्मात तेढ निर्माण करणाऱ्याला कायद्याअन्वये शिक्षा व्हावी. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, असं आवाहनही आंबेडकर यांनी केलं.
(VBA And Raza Academy Morcha Vidhan bhawan Demand muslim Reservation Prakash Ambedkar)
हे ही वाचा :
भाजपची वेगवान पावलं, अजित पवार, अनिल परब यांची CBI चौकशी करा, थेट अमित शाहांना पत्र