लातूर शहरमध्ये वंचितमुळे काँग्रेसची दमछाक

वंचितच्या उमेदवारामुळे काँग्रेसच्या मतांचं (Latur Vanchit Bahujan Aghadi) मोठ्या प्रमाणात विभाजन झालंय, ज्याचा थेट फायदा भाजपच्या उमेदवाराला झाल्याचा अंदाज आहे.

लातूर शहरमध्ये वंचितमुळे काँग्रेसची दमछाक
Follow us
| Updated on: Oct 22, 2019 | 10:19 PM

लातूर : गेल्या अनेक वर्षांपासून लातूर शहर हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र यावेळेला हा किल्ला ढासळतो की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. कारण, काँग्रेससमोर वंचित बहुजन आघाडीने (Latur Vanchit Bahujan Aghadi) मोठं आव्हान निर्माण केलं आहे. त्यामुळे लातूर शहरात भाजपा येईल की काँग्रेस हा अंदाज बांधणं कठीण काम झालंय. वंचितच्या उमेदवारामुळे काँग्रेसच्या मतांचं (Latur Vanchit Bahujan Aghadi) मोठ्या प्रमाणात विभाजन झालंय, ज्याचा थेट फायदा भाजपच्या उमेदवाराला झाल्याचा अंदाज आहे.

वंचित आघाडीने राजासाब मणियार हे मुस्लीम उमेदवार दिले. त्यामुळे काँग्रेसकडे परंपरागत असलेला दलित-मुस्लीम मतदार मोठ्या संख्येने वंचितकडे वळल्याची चर्चा आहे. लातूर शहरात मुस्लीम, दलित आणि लिंगायत मतांची संख्या मोठी आहे. काँग्रेसकडून अमित देशमुखांनी निवडणुकीत प्रचारात आघाडी घेतली. तरी काँग्रेसला ही लढाई सोपी आहे असं दिसत नाही. भाजपाने यावेळी जाहीर सभा-रॅली यावर भर न देता प्रत्येक मतदार गाठण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपोआपच हा मतदारसंघ तिहेरी लढतीचा बनला.

काँग्रेस-भाजपा आणि वंचित आघाडी अशी तिहेरी लढत इथे पाहायला मिळत आहे. काँग्रेसला मात्र लोक वंचितला फार सहकार्य करणार नाहीत आपणच निवडून येऊ असा विश्वास वाटतो आहे. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे थोरले चिरंजीव अमित देशमुख यांची प्रतिष्ठा या मतदारसंघात पणाला आहे, तर दुसरीकडे ग्रामीण मतदारसंघात धाकटे चिरंजीव धीरज देशमुख हे निवडणूक लढवत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.