चंदनतस्काराच्या मुलीच्या हाती कमळ, नरेंद्र मोदींच्या प्रेरणेने विद्याराणी भाजपात

नवी दिल्ली : कुख्यात चंदनतस्कर वीरप्पनच्या मुलीने भाजपचा झेंडा हाती धरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेरणेने मी पक्षप्रवेश करत आहे, अशा भावना विद्याराणीने व्यक्त केल्या. (Veerappan Daughter Vidyarani in BJP) तामिळनाडूतील भाजप नेते मुरलीधर राव आणि पोन राधाकृष्णन यांच्यासह भाजप नेत्यांच्या उपस्थितीत विद्याराणीने भाजपप्रवेश केला. विविध पक्षांच्या जवळपास एक हजार कार्यकर्त्यांनीही यावेळी भाजपचा झेंडा हाती […]

चंदनतस्काराच्या मुलीच्या हाती कमळ, नरेंद्र मोदींच्या प्रेरणेने विद्याराणी भाजपात
Follow us
| Updated on: Feb 24, 2020 | 11:52 AM

नवी दिल्ली : कुख्यात चंदनतस्कर वीरप्पनच्या मुलीने भाजपचा झेंडा हाती धरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेरणेने मी पक्षप्रवेश करत आहे, अशा भावना विद्याराणीने व्यक्त केल्या. (Veerappan Daughter Vidyarani in BJP)

तामिळनाडूतील भाजप नेते मुरलीधर राव आणि पोन राधाकृष्णन यांच्यासह भाजप नेत्यांच्या उपस्थितीत विद्याराणीने भाजपप्रवेश केला. विविध पक्षांच्या जवळपास एक हजार कार्यकर्त्यांनीही यावेळी भाजपचा झेंडा हाती धरला. काही दिवसांपूर्वी भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालनेही भाजपमध्ये प्रवेश केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या कल्याणकारी योजनांच्या प्रेरणेतून भाजपमध्ये प्रवेश केला, असं वीरप्पनची मुलगी विद्याराणीने सांगितलं. कुठल्याही जाती-धर्माच्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून मदत करण्याची आपली इच्छा असल्याचं विद्याराणी म्हणाली. विद्याराणी तामिळनाडूतील कृष्णगिरीमध्ये गेल्या वर्षभरापासून गरजू विद्यार्थ्यांना शिकवते.

वीरप्पनचा हैदोस

ऐंशीच्या दशकापासून वीरप्पनने तामिळनाडूत हैदोस घातला होता. अपहरण, हत्तींची शिकार आणि चंदन तस्करीसाठी तो कुख्यात होता. तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागातील जंगलात तो सक्रिय होता.

वीपरप्पनला पकडण्यासाठी 1990 मध्ये कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन्ही राज्य सरकारांनी मिळून विशेष कृती दल (एसटीएफ) स्थापन केलं होतं. त्यावेळी जयललिता तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. 18 ऑक्टोबर 2004 रोजी तामिळनाडूच्या विशेष कृती दलासोबत झालेल्या चकमकीत वीरप्पनचा खात्मा करण्यात आला होता. (Veerappan Daughter Vidyarani in BJP)

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.