भाजपची पोटनिवडणुकीची तयारी, जयसिद्धेश्वरांच्या जागी नव्या महाराजांना रिंगणात उतरवणार?

विरोधातील कॉंग्रेस आणि वंचितकडून कोण निवडणूक लढवणार याबाबत अद्याप काहीही माहिती समोर (venkateshwar mahaswamiji solapur by-election) आली नाही.

भाजपची पोटनिवडणुकीची तयारी, जयसिद्धेश्वरांच्या जागी नव्या महाराजांना रिंगणात उतरवणार?
Follow us
| Updated on: Feb 29, 2020 | 5:31 PM

सोलापूर : भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या अवैध ठरलेल्या जातप्रमाणपत्रावरुन सोलापूरचे (venkateshwar mahaswamiji solapur by-election) राजकारण तापले आहे. जात पडताळणीत समितीने खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांचा जातीचा दाखला रद्द केला आहे. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक होण्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. कोणत्या पक्षाकडून कोण निवडणुकीला उभं राहणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. पण त्यापूर्वी एका महाराजाने भाजपकडून ही पोटनिवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे.

कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील चडचड येथील व्यंकटेश्वर महास्वामी उर्फ दीपक कटकधोंड असे या महाराजांचे नाव आहे. त्यांनी भाजपकडून ही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी ते कर्नाटकातील आणि दिल्लीतील भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

या महाराजांनी खासदार जयसिद्धेश्वर विरोधात हिंदुस्थान जनता पार्टीच्या वतीने लोकसभा निवडणूक लढली होती. त्यावेळी त्यांनी केवळ 9 रुपये संपत्ती दाखवली होती. तर 45 हजारांचे कर्ज असल्याच्या उल्लेख शपथपत्रात केला होता. त्यामुळे हे महाराज चर्चेत आले (venkateshwar mahaswamiji solapur by-election) होते.

भाजप खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्यांना धक्का, जातीचा दाखला रद्द, खासदारकी धोक्यात

सोलापूर लोकसभेचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा जातीचा दाखला जातपडताळणी समितीने अवैध ठरवला आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. याविरोधात प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरु केली आहे. खासदाराकडून जातपडताळणी समितीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभेची पोटनिवडणूक लागणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत.

याआधीच जातपडताळणी समितीच्या निकालानंतर भाजप नेते लक्ष्मणराव ढोबळे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पक्षाने संधी दिल्याने निवडणूक लढवू अशी इच्छा ढोबळे यांनी व्यक्त केली. त्यात आता एका महाराजांची भर (venkateshwar mahaswamiji solapur by-election) पडली आहे.

जयसिद्धेश्वरांना धक्का, अजित पवारांकडून पोटनिवडणुकीची तयारी, काँग्रेसचा उमेदवार उतरवणार

निवडणूक लढविण्यासाठी आपल्याकडे राखीव मतदार संघासाठी आवश्यक असलेला अनुसूचित जातीचा दाखला आमच्याकडे आहे, असे व्यंकटेश्वर महास्वामी यांनी म्हटलं आहे. मात्र डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या जातीच्या बनावट दाखल्याचं प्रकरण समोर आल्याने लोक आमच्याकडेही संशयाने बघतात, अशी खंत महास्वामींनी व्यक्त केली.

सोलापूरची पोटनिवडणूक ही आता खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींच्या उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर अवलंबून आहे. विरोधातील कॉंग्रेस आणि वंचितकडून कोण निवडणूक लढवणार याबाबत अद्याप काहीही माहिती समोर (venkateshwar mahaswamiji solapur by-election) आली नाही.

कोण आहेत व्यकंटेश्वर महास्वामी? (venkateshwar mahaswamiji Information) 

  • व्यकंटेश्वर महास्वामी उर्फ दिपक कटकधोंड हे कर्नाटकातील रहिवासी आहे.
  • ते विजापूर जिल्ह्यातील चडचड तालुक्यात राहतात.
  • नागठाण विद्यापीठातून त्यांनी बीकॉमची पदवी घेतली आहे.
  • त्यांच्याकडे कोणतीही जंगम अथवा स्थावर मालमत्ता नाही. त्यांच्यावर कुणीही अवलंबून नाही.
  • केवळ 9 रुपये संपत्ती दाखवली होती. तर 45 हजारांचे कर्ज असल्याच्या शपथपत्रात उल्लेखामुळे ते चर्चेत आले होते.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.