केजरीवाल यांच्याविरोधात 9 रुपये रोकड असणारा ‘आम आदमी’ निवडणूक रिंगणात

दिल्ली विधानसभा निवडणूकीत आम आदमी पक्षाने एकाच वेळी सर्व 70 उमेदवारांची यादी जाहीर केली. आपचे प्रमुख आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वतः नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत.

केजरीवाल यांच्याविरोधात 9 रुपये रोकड असणारा 'आम आदमी' निवडणूक रिंगणात
Follow us
| Updated on: Jan 15, 2020 | 5:08 PM

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूकीत आम आदमी पक्षाने एकाच वेळी सर्व 70 उमेदवारांची यादी जाहीर केली. आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वतः नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. मात्र, त्यांच्याविरोधात फक्त 9 रुपये रोकड असलेल्या व्यक्तीने आव्हान दिलं आहे (Venkteshwar maharaj swami standing against Arvind kejarival). व्यंकटेश्वर महाराज स्वामी असं या उमेदवाराचं नाव आहे. व्यंकटेश्वर यांना दीपक नावानेही (Venkteshwar maharaj swami standing against Arvind kejarival) ओळखलं जातं.

व्यंकटेश्वर यांनी आतापर्यंत 16 निवडणुका लढवल्या आहेत. यामध्ये कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकांचाही समावेश आहे.

व्यंकटेश्वर स्वामींकडून तीन उमेदवारी अर्ज दाखल

अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात 21 जानेवारीला व्यंकटेश्वर विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. विशेष म्हणजे व्यंकटेश्वर तीन उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत. व्यंकटेश्वर यांनी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि हिंदुस्तान जनता पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळवण्यासाठीही मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अर्ज दाखल करताना त्यांनी 10 हजार रुपये सुरक्षा रक्कम देखील जमा केली आहे.

व्यंकटेश्वर यांना भाजपकडून उमेदवारीची अपेक्षा 

“भाजपने माझ्या कामाची दखल घेतली आहे. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या लोकांवर भाजपचं नेहमीच लक्ष असतं. त्यामुळे समाजातील माझं काम पाहून भाजप मला पक्षाची अधिकृत उमेदवारी देईल, अशी मला अपेक्षा आहे, असं व्यंकटेश्वर यांनी सांगितले.

व्यंकटेश्वर यांना एनसीपीकडूनही उमेदवारी मिळण्याची अपेक्षा

“तिन्ही पक्षासाठी अर्ज भरल्यानंतर व्यंकटेश्वर म्हणाले, “मी आतापर्यंत निस्वार्थ मनाने समाजसेवा केली आहे. आता मला दिल्लीत काम करायचं आहे. जर त्यांना वाटत असेल मी योग्य उमेदवार होऊ शकतो, तर मला विश्वास आहे कोणताही पक्ष मला समर्थन देईल. जर भाजपनं मला तिकीट दिले नाही तर इतर दोन पक्ष मला तिकीट देतील”, असा मला विश्वास वाटतो.

व्यंकटेश्वर यांच्याकडे दिल्लीत राहण्यासाठी जागा नाही

व्यंकटेश्वर स्वामी सध्या द्वारकामध्ये आपल्या मित्रांसोबत राहतात. दिल्लीत त्यांच्याकडे राहण्यासाठी एकही जागा नाही. त्यांचा मित्र मजदूर ठेकेदार आहे. आपल्या उमेदवारी अर्जात त्यांनी माहिती दिली आहे की, त्यांच्याजवळ फक्त 9 रुपये रोकड आहे. त्यांनी शरद पवार (राष्ट्रवादीचे नेते नसून इतर कुणी) नावाच्या मित्राकडून 99 हजार 999 रुपये उसणे घेतले आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.