भाजपला रामराम, ज्येष्ठ शिवसैनिकाच्या हाती पुन्हा शिवबंधन
शिवसेनेत एकेकाळी ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे शशिकांत चव्हाण मध्यंतरी काही कारणामुळे भाजपात गेले होते.
मुंबई : शिवसेनेला सोडून भाजपचा झेंडा हाती घेतलेल्या शशिकांत चव्हाण यांनी पुन्हा हाती शिवबंधन बांधले आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत चव्हाण यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला. (Veteran Shivsainik Shashikant Chavan returns to Shivsena left BJP)
शिवसेनेत एकेकाळी ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे शशिकांत चव्हाण मध्यंतरी काही कारणामुळे भाजपात गेले होते. मात्र त्यांनी पुन्हा भाजपला रामराम करत शिवसेनेची वाट धरली. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत शशिकांत चव्हाण स्वगृही परतले.
शशिकांत चव्हाण हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे. परंतु मध्यंतरीच्या काळात शिवसेनेपासून दूर जात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
रामदास कदम यांच्या मुंबई येथील निवासस्थानी आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत परतले. त्यामुळे शिवसेनेची ताकद पुन्हा वाढल्याचे बोलले जाते. शशिकांत चव्हाण यांच्या खांद्यावर लवकरच मोठी जबाबदारी दिली जाईल अशी चर्चा आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
VIDEO : Prakash Ambedkar | “उद्धव ठाकरेंनी देव बनू नये”, प्रकाश आंबेडकरांची उद्धव ठाकरेंवर टीका https://t.co/5ubEcdvWEk
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 26, 2020
(Veteran Shivsainik Shashikant Chavan returns to Shivsena left BJP)