Eknath Shinde: विजय आमचाच, कामाख्या देवीच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदेंना विश्वास, बंडखोर आमदारांचही हसतखेळत देवदर्शन

एकनाथ शिंदे म्हणाले, आम्हाला कुणी थांबवू शकत नाही. कारण लोकशाहीत नंबर आणि बहुमताला महत्त्व असते. या देशात संविधान, नियम यापुढं कुणी जाऊ शकत नाही. बहुमत चाचणीनंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार. छत्रपती शिवाजी महाराजांनापण वंदन करणार. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनादेखील आम्ही वंदन करणार.

Eknath Shinde: विजय आमचाच, कामाख्या देवीच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदेंना विश्वास, बंडखोर आमदारांचही हसतखेळत देवदर्शन
एकनाथ शिंदेImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 4:38 PM

गुवाहाटी : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानं राजकारणात चांगलाच भूकंप आलाय. एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेलेत. आज ते गुवाहाटीवरून (Guwahati) गोव्याला रवाना होणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले. विजय आमचाच होईल, असा विश्वास कामाख्या देवीच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. शिंदे म्हणाले, सर्व आमदारांनी आज कामाख्या देवीचं दर्शन (Darshan of Goddess Kamakhya) घेतलंय. वेगळा आनंद, वेगळं समाधान मिळालाय. कोणत्याही आमदाराला जबरजस्तीनं आणलेलं नाही. सर्व आनंदी आहेत, असं त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं. बाळासाहेबांची शिवसेना हीच आमची शिवसेना असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. उद्या आम्ही मुंबईत (Mumbai) पोहचू. आमच्याकडं 50 आमदार आहेत. दोन तृतांशपेक्षा जास्त बहुमत आमच्याकडं आहे. त्यामुळं आम्हाला कोणत्याही फ्लोअर टेस्टची चिंता नाही. जी काही प्रक्रिया होईल, त्यात आम्ही नक्कीच पास होऊ.

बाळासाहेबांची शिवसेना आम्ही पुढं घेऊन जातोय

एकनाथ शिंदे म्हणाले, आम्हाला कुणी थांबवू शकत नाही. कारण लोकशाहीत नंबर आणि बहुमताला महत्त्व असते. या देशात संविधान, नियम यापुढं कुणी जाऊ शकत नाही. बहुमत चाचणीनंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार. छत्रपती शिवाजी महाराजांनापण वंदन करणार. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनादेखील आम्ही वंदन करणार. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. ही हिंदुत्वाला सामोरे नेणारी शिनसेना आहे. महाराष्ट्र हे जनतेच राज्य सुजलाम सुफलाम करण्यासाठी, या महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना आम्ही पुढं घेऊन जातोय.

सर्व बंडखोर आमदारांनी घेतलं हसत खेळत दर्शन

बंडखोर आमदारांनीही हसतखेळत कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. कामाख्या देवीचं दर्शन घेत असताना पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. आमदारांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. दोन बसमधून बंडखोर आमदार कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले. आसाममध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं शिंदे गटाचे आमदार खबरदारीचा इशारा म्हणून गोव्याच्या दिशेनं रवाना होणार आहेत. कामाख्या देवीचं दर्शन झाल्यानंतर बंडखोर आमदार गुवाहाटीच्या दिशेनं परतणार आहेत. त्यानंतर दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास आमदार गोव्याच्या दिशेनं रवाना होतील. राजकारचाची नवी सुरुवात म्हणून एकनाथ शिंदे यांनी देवीचं दर्शन घेतलं. बंडखोर आमदारांपुढं आता बहुमत चाचणीसाठी आणण्याचं आव्हान आहे. बहुमत चाचणीपर्यंत शिवसेना नेत्यांपासून दूर ठेवण्यासाठी मोठी खबरदारी घेतली जातेय.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.