Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : बंडातात्या कराडकर यांचं सुप्रिया सुळे, पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य! आता माफी मागायलाही तयार

वाईन धोरणाविरोधात बोलताना कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. बंडातात्या कराडकर यांच्या या वक्तव्यावर आता राज्यभरात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपसह सर्वच पक्षाच्या महिला नेत्यांनी बंडातात्या यांच्यावर जोरदार टीका केलीय. तसंच त्यांनी माफी मागावी अशी मागणीही करण्यात येत आहे

Video : बंडातात्या कराडकर यांचं सुप्रिया सुळे, पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य! आता माफी मागायलाही तयार
बंडातात्या कराडकर, पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 8:07 PM

भंडारा : महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) वाईन धोरणाविरोधात बोलताना कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. बंडातात्या कराडकर यांच्या या वक्तव्यावर आता राज्यभरात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपसह सर्वच पक्षाच्या महिला नेत्यांनी बंडातात्या यांच्यावर जोरदार टीका केलीय. तसंच त्यांनी माफी मागावी अशी मागणीही करण्यात येत आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) दारु पितात, असं वक्तव्य बंडातात्या यांनी केलं होतं. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता हे आपण पुराव्यानिशी सिद्ध करु शकतो, असंही बंडातात्या पुढे जाऊन म्हणाले.

बंडातात्या नेमकं काय म्हणाले?

महिला नेत्यांकडून बंडातात्यांवर जोरदार टीका

शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतलाय. बंडातात्या कराडकर स्वत:ला कीर्तनकार म्हणवतात आणि अशाप्रकारे स्त्रीत्वाचे धिंडवडे काढतात. स्त्रियांचा जाहीररित्या अपमान करतात. हे खपवून घेतलं जाणार नाही. त्यांनी जाहीररित्या माफी मागावी. अन्यथा मी पोलिसांना विनंती करते की त्यांनी बंडातात्या यांना जाब विचारावा, त्यांना चौकशीला बोलवावं, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कायंदे यांनी केलीय.

तर खासदार नवनीत राणा यांनीही बंडातात्या यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. आम्ही वाईनच्या विरोधात आहोत. या निर्णयावर महाराष्ट्रातील आम्ही सगळ्या महिला विरोधात आहोत. पण बंडातात्या कराडकर यांचे महिलांबाबतचं वक्तव्य, अशा प्रकारचं बोलणं आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा नवनीत राणा यांनी दिलाय.

त्याचबरोबर नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रुपाली पाटील यांनीही बंडातात्यांवर जोरदार टीका केलीय. बंडातात्या कराडकर यांनी माफी मागावी. सुप्रिया सुळे या महिलांचं नेतृत्व करतात. त्यामुळे बंडातात्यांनी महिलांचा अपमान केलाय, त्यामुळे बंडातात्यांनी महिलांची माफी मागितली पाहिजे, अशी आक्रमक मागणी रुपाली पाटील यांनी केलीय.

‘माफी मागायला तयार, विषय आता संपवा’

दरम्यान, बंडातात्या कराडकर यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांना फोन करुन माफी मागितल्याची माहिती मिळत आहे. तसंच आपल्या वक्तव्याचे माध्यमामध्ये जोरदार पडसाद उमटल्यानंतर आपण माफी मागायला तयार आहोत, पण आता हा विषय संपवा, असं बंडातात्या म्हणाले. मी फक्त एवढंच बोललो नाही. मात्र, माध्यमांमध्ये माझं तेवढंच वक्तव्य दाखवण्यात आलं. आपण चुकलो असू तर माफी मागण्यात कमीपणा नसतो, असं म्हणत बंडातात्या यांनी दिलगिरी व्यक्त केलीय

इतर बातम्या :

Breaking : उत्तर प्रदेशात असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार! ओवेसी सुखरुप

‘महापालिकेत 20 वर्षे सत्ता, पण रस्त्यावर गाडी व्हायब्रेट मोडवर जाते’, मुंबई महापालिका अर्थसंकल्पावरुन मुनगंटीवारांचा शिवसेनेवर निशाणा

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडूंनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं! ऑडिओ क्लिप व्हायरल