VIDEO : रिकाम्या खुर्च्यांचा फोटो का काढला? काँग्रेस कार्यकर्त्यांची पत्रकाराला मारहाण
चेन्नई : प्रचारसभेत रिकाम्या खुर्च्यांचा फोटो काढल्यामुळे छायचित्र पत्रकाराला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण करण्यात आली. तामिळनाडूमधील विरुद्धनगर येथे ही घटना घडली. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मारहाणीत पत्रकार गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. काँग्रेसचा जाहीरनामा घोषित करण्यासाठी या सभेचं आयोजन […]
चेन्नई : प्रचारसभेत रिकाम्या खुर्च्यांचा फोटो काढल्यामुळे छायचित्र पत्रकाराला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण करण्यात आली. तामिळनाडूमधील विरुद्धनगर येथे ही घटना घडली. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मारहाणीत पत्रकार गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
काँग्रेसचा जाहीरनामा घोषित करण्यासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी काँग्रेसचे प्रेदश प्रभारी के.एस. अलागिरीही उपस्थित होते. मात्र, या सभेला कार्यकर्त्यांची गर्दी कमी होती आणि मोठ्या प्रमाणात खुर्च्या रिकाम्या होत्या. यावेळी एका पत्रकाराने या रिकाम्या खुर्च्यांचे फोटो घेण्यास सुरुवात केली. यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी थेट या पत्रकारावर हल्ला चढवला.
#WATCH Tamil Nadu: Congress workers manhandle and thrash photojournalists who were allegedly clicking pictures of empty chairs at a public rally by the party in Virudhunagar. (06.04.2019) pic.twitter.com/epTiD9iLtK
— ANI (@ANI) April 7, 2019
तिथे उपस्थित इतर पत्रकारांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्यावरही काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला. यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला करत पत्रकारांना वाचवलं. यामध्ये जखमी झालेल्या पत्रकारांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चेन्नई प्रेस क्लबतर्फे मारहाण करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राहुल गांधींची पत्रकारांना मदत
केरळच्या वायनाड मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी राहुल गांधींचा रोड शो होता. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दरम्यान, गर्दीमुळे बॅरिगेट्स तुटले आणि यामध्ये 3 पत्रकार जखमी झाले. यावेळी स्वत: राहुल गांधी हे पत्रकारांना रुग्णवाहिकेपर्यंत सोडायला गेले. यामध्ये ‘टीव्ही 9’ च्या महिला पत्रकाराचाही समावेश होता.
तामिळनाडूमध्ये काँग्रेसने स्टॅलिनच्या डीएमकेसोबत आघाडी केली आहे. तामिळनाडूमध्ये 39 लोकसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये 9 जागांवर काँग्रेस निवडणूक लढवत आहे आणि 30 जागांवर डीएमके निवडणूक लढवणार आहेत. दुसरीकडे भाजपा आणि तामिळनाडू राज्यातील सत्ताधारी एआयडीएमके यांच्यात युती झाली आहे. यामध्ये भाजपच्या वाट्याला पाच जागा आल्या आहेत, तर इतर जागांवर एआयडीएमके निवडणूक लढवणार आहेत.