Video : अजितदादांनी इलेक्ट्रिक रिक्षा चालवली, रोहित पवारांनी टेम्पोचं स्टेअरिंग हाती घेतलं!

अहमदनगरला 'माझा व्यवसाय, माझा हक्क' योजनेंतर्गत युवकांना रोजगाराची संधी रोहित पवार यांनी उपलब्ध करून देत वाहनांचे वाटप केलं. त्यावेळी रोहित पवारांनी टेम्पोचं स्टेअरिंग हाती घेत एक चक्करही मारली!

Video : अजितदादांनी इलेक्ट्रिक रिक्षा चालवली, रोहित पवारांनी टेम्पोचं स्टेअरिंग हाती घेतलं!
आमदार रोहित पवारांनी चालवला टेम्पो
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 10:48 PM

अहमदनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती दौऱ्यावर असताना पियाजो कंपनीला भेट दिली. त्यावेळी त्यांनी इलेक्ट्रिक रिक्षाची माहिती जाणून घेतली. इतकंच नाही तर कंपनीच्या परिसरात त्यांनी रिक्षाची सैरही केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांचाही एक व्हिडीओ समोर आलाय. अहमदनगरला ‘माझा व्यवसाय, माझा हक्क’ योजनेंतर्गत युवकांना रोजगाराची संधी रोहित पवार यांनी उपलब्ध करून देत वाहनांचे वाटप केलं. त्यावेळी रोहित पवारांनी टेम्पोचं स्टेअरिंग हाती घेत एक चक्करही मारली! (Ajit Pawar drove the electric rickshaw while Rohit Pawar drove the tempo in Ahemadnagar)

‘माझा व्यवसाय, माझा हक्क’ योजनेंतर्गत रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघातील युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला आहे. युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. त्यांना स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी सहकार्य मिळावं, या अनुषंगाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत ‘माझा व्यवसाय, माझा हक्क’ ही योजना कर्जत-जामखेड मतदारसंघात राबवली जात आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना रोहित पवार यांच्या हस्ते टेम्पोची चावी देऊन गाड्यांचं वितरण करण्यात आलं. त्यावेळी रोहित पवार यांना टेम्पो चालवण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी टेम्पोचं स्टेअरिंग हाती घेत एक चक्करही मारली.

अजित पवारांनी चालवली इलेक्ट्रिक रिक्षा

इंधनाचे दर गगनाला भिडले असताना आता इलेक्ट्रिक वाहनांवर भर दिला जातोय. या पार्श्वभूमीवर आता वाहन निर्मिती कंपन्यांकडूनही आता इलेक्ट्रिक वाहन निर्मितीवर भर दिला जात आहे. उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये पियाजो कंपनीच्या इलेक्ट्रिक रिक्षाचं हँडल हाती घेतलं. अजितदादांनी ही रिक्षा चालवली आणि राज्यभरात या रिक्षा राईडची चर्चा रंगली.

पियाजो कंपनीला भेट दिल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अजितदादांना आपल्या नव्या उत्पादनाबाबत माहिती दिली. नव्या इलेक्ट्रिक रिक्षाबाबत माहिती जाणून घेतल्यानंतर अजितदादांना रिक्षा चालवण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी थेट रिक्षाचं हँडल हातात घेतलं. अजितदादांनी ही रिक्षा कंपनीच्या आवारातच चालवली. अजितदादांना रिक्षा चालवताना पाहून कंपनीचे कर्मचारीही अवाक झाले होते. यावेळी अजितदादांनी या इलेक्ट्रिक रिक्षाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली आणि कंपनीच्या या उत्पादनाचं कौतुकही केलं.

इतर बातम्या : 

‘काही जित्राबं लय वाईट असतात’, अजित पवारांच्या सडेतोडपणाचे 8 पुरावे, वाचा सविस्तर

सांगू का आता पोलिसांना उचलायला, पुन्हा म्हणाल दादा लय कडक आहे, कॅमेरामनवर अजित पवारांची टोलेबाजी

Ajit Pawar drove the electric rickshaw while Rohit Pawar drove the tempo in Ahemadnagar

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.