Video : देवेंद्र फडणवीसांचा पेनड्राईव्ह बॉम्ब! विशेष सरकारी वकिलांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये गिरीश महाजनांबाबत कोणता गौप्यस्फोट?

विशेष सरकारी वकील प्रविण पंडित चव्हाण यांचे अनेक व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे (Assembly Speaker) दिलाय. अजित पवार, छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, अनिल गोटे, एकनाथ खडसे, जयकुमार रावल, हेमंत नगराळे आदींबाबत विशेष सरकारी वकिलांच्या व्हिडीओमधील संवाद फडणवीसांनी वाचून दाखवलाय.

Video : देवेंद्र फडणवीसांचा पेनड्राईव्ह बॉम्ब! विशेष सरकारी वकिलांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये गिरीश महाजनांबाबत कोणता गौप्यस्फोट?
विशेष सरकारी वकीलांच्या व्हिडीओतील गिरीश महाजन यांच्याशी संबंधित संवाद फडणवीसांनी सांगितलाImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 8:23 PM

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत ‘पेनड्राईव्ह बॉम्ब’ टाकून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिलीय. राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) यांच्यावर फडणवीसांनी गंभीर आरोप केलाय. सरकारकडून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखलं जात असल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केलाय. विशेष सरकारी वकील प्रविण पंडित चव्हाण यांचे अनेक व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे (Assembly Speaker) दिलाय. अजित पवार, छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, अनिल गोटे, एकनाथ खडसे, जयकुमार रावल, हेमंत नगराळे आदींबाबत विशेष सरकारी वकिलांच्या व्हिडीओमधील संवाद फडणवीसांनी वाचून दाखवलाय.

महाजनांविरोधात ठाकरे सरकारचं षडयंत्र?

माजी मंत्री आणि भाजप आमदार गिरीश महाजन यांच्याबाबत राज्य सरकारकडून कशाप्रकारे षडयंत्र रचलं गेलं याबाबत फडणवीसांनी गंभीर आरोप केलाय. फडणवीस म्हणाले की, गिरीश महाजनांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला. 2021 मध्ये असा गुन्हा दाखल केला की 2018 मध्ये मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या एका वादाबाबत भोईटे गटाच्या वतीनं महाजनांची स्वीय सहायक रामेश्वर यांनी पाटील गटाच्या एकाचं अपहरण केलं. मग गिरीश महाजनांचा फोन आला त्यांनी धमकी दिली. त्या आधारावर त्याला सांगण्यात आलं की तू त्या विद्या प्रसारक मंडळाचा राजीनामा दे. त्यावर आम्हाला यायचं आहे. अशाप्रकारची अत्यंत बनावट केस तयार केली. त्या पलिकडे जाऊन गिरीश महाजनांचा मकोका लागला पाहिजे म्हणून तशी कागदपत्र गोळा केली गेली. पण महाजनांना कोर्टाकडून दिलासा मिळाल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

गिरीश महाजनांबाबत विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी काय वक्तव्ये केली, कशाप्रकारे महाजनांना अडकवण्याचा डाव आखला जात होता? याबाबतचा संवाज फडणवीसांनी वाचून दाखवला. तो संवाद खालीलप्रमाणे….

तो गिरीश महाजन यांचे नाव घ्यायला तयार आहे ना? एक छोटा जबाब तयार करतो. तो माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहे का? ड्रग्जचे नाव घेतले की, आपला मोक्का एकदम फिट बसतो. आणि ड्रग्ज सापडलेच पाहिजे, असे कुठे आहे? सापडले तरच गुन्हेगार असतो, असे नाही. केवळ संशय क्रिएट करणे पुरेसे. शिक्षण संस्था आहे, तेथे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मार्केट खूप मोठे आहे, असे सांगायचे. त्याला पैसे दिले आहेत ना आपण? सुनील गायकवाड, महेंद्र बागुल, सूर्यवंशी. रवि शिंदेने त्याचे नाथाभाऊंशी बोलणे करून दिले. संस्था आपल्या ताब्यात आहे तोवर कोट्यवधी रुपये कमवू शकतो, असे भासवायचे.

ऑडिओमध्ये नेमकं काय?

– गिरीश महाजन डायरेक्ट नाव येईल, असे स्टेटमेंट घ्या. विश्वजितचे स्टेटमेंट घ्या. 18 चे स्टेटमेंट झाले तर मजा येईल. एक लेडिज कोण आहे, तिचे स्टेटमेंट घेतले तर त्याला अटक होऊन जाईल.

इतर बातम्या :

अजितदादा हे तुमच्याबद्दल आहे, फडणवीसांचा सभागृहात पेनड्राईव्ह बॉंब, अजित पवार काय बोलणार?

फडणवीसांनी विधानसभेत मांडला महाविकास आघाडीचा “महाकत्तलखाना”, सरकारवर आरोपांची सरबत्ती

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.