Video: पुणे महिला सरपंच मारहाण प्रकरणी ट्विस्ट, नव्या व्हिडीओनं सरपंच गोत्यात, आधी कानशिलात लगावल्याचा आरोप

या प्रकरणात आता एक नवा व्हिडीओ समोर आलाय. त्यामुळे या प्रकरणात नवं ट्विस्ट पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये महिला सरपंच गौरी गायकवाड या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला कानशिलात लगावताना पाहायला मिळत आहेत.

Video: पुणे महिला सरपंच मारहाण प्रकरणी ट्विस्ट, नव्या व्हिडीओनं सरपंच गोत्यात, आधी कानशिलात लगावल्याचा आरोप
महिला सरपंच गौरी गायकवाड मारहाण प्रकरणात नवा व्हिडीओ समोर
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 8:18 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून एका महिला सरपंचाला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला होता. संबंधित घटना ही पुण्यातील कदमवाकवस्ती भागात लसीकरण केंद्रात घडली होती. दरम्यान, या प्रकरणात आता एक नवा व्हिडीओ समोर आलाय. त्यामुळे या प्रकरणात नवं ट्विस्ट पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये महिला सरपंच गौरी गायकवाड या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला कानशिलात लगावताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. (Gauri Gaikwad new video of Mahila Sarpanch Gauri Gaikwad assault case)

कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीकडून लसीकरण केंद्र सुरु करण्यात आलं होतं. त्यावेळी काही कारणामुळे तिथे वाद निर्माण झाला आणि त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता सुजित काळभोर याने महिला सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. त्याबाबतचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गौरी गायकवाड यांनी केलेल्या आरोपानुसार त्या लसीकरण केंद्रावर पाहणीसाठी गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी सगळ्यांची विचारपूसही केली. तेव्हा सुजित काळभोर आणि एका ग्रामपंचायत सदस्याच्या मुलामध्ये वाद झाला. काळभोर याने त्या मुलाला मारहाण केली. त्याबाबत विचारलं असता काळभोर याने आपल्यालाही शिवीगाळ केली, हात पिरगाळला आणि मारहाण केल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे.

मारहाण प्रकरणाचा दुसरा व्हिडीओ समोर

दरम्यान, आज दुसरा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात सुजित काळभोर याला दोन – तीन जणांनी पकडून मारहाण केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावेळी गौरी गायकवाडही त्या ठिकाणी धावत आल्या आणि त्यांनी सुजित काळभोर या व्यक्तीला कानशिलात लगावल्याचं दिसून येत आहे. मात्र, ही क्रियेला दिलेली प्रतिक्रिया असल्याचं ठाम मत गौरी गायकवाड यांनी मांडलं आहे.

सुजित काळभोरचा आरोप काय?

तर सुजित काळभोर याच्या दाव्यानुसार मी लसीकरणासाठी रांगेत उभा होतो. तिथे अविनाश बडदे नावाचा मुलगा टोकन वाटण्यासाठी होता. मी त्याला जाब विचारला. त्याच्यात आणि माझ्यात शाब्दिक वाद झाला. त्या ठिकाणी शेजारी गौरी गायकवाड उभ्या होत्या. त्यांनी काय घडलं हे न विचारताच मला दोन कानशिलात मारल्या. त्यांनी माझी कॉलर पकडली आणि त्या खाली कोसळल्या. तेव्हा मी त्यांना हात दिला, तर तोच व्हिडीओ व्हायरल करुन मला मारहाण झाली, असं खोटं सांगितलं जात असल्याचा आरोप काळभोर याने केला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात दोन्ही बाजूंनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Gauri Gaikwad new video of Mahila Sarpanch Gauri Gaikwad assault case)

चित्रा वाघ गौरी गायकवाडांच्या भेटीला

दरम्यान, या प्रकरणी भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महिला सरपंच गौरी गायकवाड यांची भेट घेतली. गायकवाड यांची विचारपूस करत महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. मुख्यमंत्र्यांना माझा सवाल आहे, महिलांना मारहाण करणाऱ्यावर काही कारवाई केली जात नाहीय, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. महिलांवर झालेल्या अत्याचारसंदर्भात आरोपीना जामीन मिळता कामा नये, यावर कायदा करायला पाहिजे. गौरी गायकवाडची केस ही राज्यातील प्रातिनिधिक स्वरूपाची आहे. ज्योती देवरेची एक क्लिप व्हायरल झाली लगेच तिला त्रास दयायला सुरुवात झाली. यासंदर्भात मी सीपीशी बोलले आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

दोषी कुणीही असो, कारवाई व्हावी- चाकणकर

तर पोलिसांना विनंती आहे की त्या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आणावं आणि सत्य बाजू समोर आणावी. पोलिसांनी त्यांची भूमिका योग्यरित्या पार पाडावी. संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज समोर आणावं. इतर पक्षाच्या ज्या उपाध्यक्षा आहेत. त्या स्थानिक पातळीवर जाऊन वाद निर्माण करत आहेत. त्यांनी हा प्रकार बंद करुन माहिती घ्यावी आणि बोलावं, असा टोला महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर लगावलाय. त्यांना बोलायचं आहे तर त्यांच्या पक्षाचे वर्ध्यातील खासदार तडस आणि त्यांच्या मुलावर सुनेला मारहाण करुन घरातून हाकलून दिल्याची तक्रार दाखल आहे, त्यावर बोलावं, असं आव्हानही चाकणकर यांनी वाघ यांना दिलंय. महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंबंधी दोषी कुणीही असो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असंही चाकणकर म्हणाल्या.

इतर बातम्या :

VIDEO: नागपुरात तीन दिवसानंतर लॉकडाऊन अटळ?, कसे असतील निर्बंध?; वाचा सविस्तर

केंद्राला वाटत असेल की शेतकरी थकेल तर तो गैरसमज, राष्ट्रवादी काँग्रेसचा केंद्र सरकारवर घणाघात

Gauri Gaikwad new video of Mahila Sarpanch Gauri Gaikwad assault case

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.