Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : भाजप आमदाराची महिलेला जबर मारहाण

गांधीनगर : मोदींच्या गुजरातमध्ये भाजप आमदाराने एका महिलेला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेला लाथा-बुक्क्यांनी आमदार मारहाण करतानाच्या व्हिडीओने सध्या गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. बलराम थवानी असं या भाजप आमदाराचं नाव आहे. गुजरात के विद्यायक महिला को लाते मारते हुए : अहमदाबाद के नरोडा ईलाके में पानी की किल्लत की शिकायत […]

VIDEO : भाजप आमदाराची महिलेला जबर मारहाण
Follow us
| Updated on: Jun 03, 2019 | 12:16 PM

गांधीनगर : मोदींच्या गुजरातमध्ये भाजप आमदाराने एका महिलेला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेला लाथा-बुक्क्यांनी आमदार मारहाण करतानाच्या व्हिडीओने सध्या गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. बलराम थवानी असं या भाजप आमदाराचं नाव आहे.

अहमदाबादच्या नरोदा येथे पाण्याच्या पाईपलाईबाबतची तक्रार घेऊन ही महिला थवानींकडे गेली होती. अशात तिची समस्या सोडवण्याचं सोडून मद्यधूंद अवस्थेत असलेल्या या आमदाराने रस्त्यावर त्यामहिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. आधी आमदाराने महिलेला थप्पड लगावला, त्यानंतर आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या महिलेला लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. यादरम्यान महिला ओरडत होती, दयेची भीक मागत होती. मात्र, कुणीही तिची मदतीला आलं नाही.

या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. सर्वच स्तरातून या आमदारावर टीकेची झोड उठवली गेली. त्यानंतर आमदार थवानी यांना जाग आली. सध्या थवानी हे प्रकरण माफी मागून दाबण्याच्या प्रयत्नात आहे. यावर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी काय कारवाई करतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

अहमदाबादच्या नरोदा विधानसभेतून आमदार असलेल्या बलराम थवानी यांसारख्या आमदारांच्या जोरावर भाजपने गुजरातमध्ये सत्ता स्थापन केली. पण हेच आमदार जर मत देणाऱ्या मतदारांसोबत अशा प्रकारचा व्यवहार करत असेल, तर मतदारांनी काय करावं, असा प्रश्न आता लोक उपस्थित करत आहेत. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये एका गोष्टीकडे जातीने लक्ष दिलं, ते म्हणजे महिला सशक्तीकरण. ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ या घोषणेच्या भरवष्यावर भाजपचे नेते देशात बदल घडवून आणण्याचं भाषणात सांगतात. सरकार महिलांना गृहउद्योगासाठी निधी उपलब्ध करुन देते, जेणेकरुन महिला आत्मनिर्भर व्हाव्या आणि दुसरीकडे त्याचं भाजप पक्षाचा आमदार एका महिलेला रस्त्यावर मारहाण करतो.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.