गांधीनगर : मोदींच्या गुजरातमध्ये भाजप आमदाराने एका महिलेला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेला लाथा-बुक्क्यांनी आमदार मारहाण करतानाच्या व्हिडीओने सध्या गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. बलराम थवानी असं या भाजप आमदाराचं नाव आहे.
गुजरात के विद्यायक महिला को लाते मारते हुए :
अहमदाबाद के नरोडा ईलाके में पानी की किल्लत की शिकायत करने गई एक महिला को गुजरात भाजपा के ‘माननीय’ विधायक बलराम थावानी ने खुलेआम बेरहमी के साथ पिटा ! @dgpgujarat, @AhmedabadPolice आप तुरंत गिरफ्तारी कीजिए! यह हरगिज नहीं चलेगा! pic.twitter.com/6mV7EmC6KV
— Jignesh Mevani (@jigneshmevani80) June 2, 2019
अहमदाबादच्या नरोदा येथे पाण्याच्या पाईपलाईबाबतची तक्रार घेऊन ही महिला थवानींकडे गेली होती. अशात तिची समस्या सोडवण्याचं सोडून मद्यधूंद अवस्थेत असलेल्या या आमदाराने रस्त्यावर त्यामहिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. आधी आमदाराने महिलेला थप्पड लगावला, त्यानंतर आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या महिलेला लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. यादरम्यान महिला ओरडत होती, दयेची भीक मागत होती. मात्र, कुणीही तिची मदतीला आलं नाही.
या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. सर्वच स्तरातून या आमदारावर टीकेची झोड उठवली गेली. त्यानंतर आमदार थवानी यांना जाग आली. सध्या थवानी हे प्रकरण माफी मागून दाबण्याच्या प्रयत्नात आहे. यावर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी काय कारवाई करतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
अहमदाबादच्या नरोदा विधानसभेतून आमदार असलेल्या बलराम थवानी यांसारख्या आमदारांच्या जोरावर भाजपने गुजरातमध्ये सत्ता स्थापन केली. पण हेच आमदार जर मत देणाऱ्या मतदारांसोबत अशा प्रकारचा व्यवहार करत असेल, तर मतदारांनी काय करावं, असा प्रश्न आता लोक उपस्थित करत आहेत. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये एका गोष्टीकडे जातीने लक्ष दिलं, ते म्हणजे महिला सशक्तीकरण. ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ या घोषणेच्या भरवष्यावर भाजपचे नेते देशात बदल घडवून आणण्याचं भाषणात सांगतात. सरकार महिलांना गृहउद्योगासाठी निधी उपलब्ध करुन देते, जेणेकरुन महिला आत्मनिर्भर व्हाव्या आणि दुसरीकडे त्याचं भाजप पक्षाचा आमदार एका महिलेला रस्त्यावर मारहाण करतो.