Video : महापालिकेनं बनवलेला सायकल ट्रॅक नगरसेवकानं उखडून टाकला! नेमकं कारण काय?
पुणे : हडपसरमध्ये महापालिकेनं बनवलेला सायकल ट्रॅक एका नगरसेवकानं उखडून टाकलाय. वाहतुकीला अडथळा ठरत असल्यानं हा सायकल ट्रॅक उखडल्याचा दावा या नगरसेवकानं केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी उड्डाणपुलाजवळ असलेला सायकल ट्रॅक काढून टाकण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. पण महापालिकेनं त्याकडे दुर्लक्ष केल्याचं कारण सांगत ससाणे यांनी जेसीबी लावून हा सायकल ट्रॅक उखडून टाकलाय. […]
पुणे : हडपसरमध्ये महापालिकेनं बनवलेला सायकल ट्रॅक एका नगरसेवकानं उखडून टाकलाय. वाहतुकीला अडथळा ठरत असल्यानं हा सायकल ट्रॅक उखडल्याचा दावा या नगरसेवकानं केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी उड्डाणपुलाजवळ असलेला सायकल ट्रॅक काढून टाकण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. पण महापालिकेनं त्याकडे दुर्लक्ष केल्याचं कारण सांगत ससाणे यांनी जेसीबी लावून हा सायकल ट्रॅक उखडून टाकलाय. (Yogesh Sasane removes bicycle track in Hadapsar made by pune Municipal Corporation)
वाहतुकीला अडथळा ठरत असल्याचं कारण सांगत नगरसेवक योगेश ससाणे यांनी हा सायकल ट्रॅक काढण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. मात्र, महापालिकेनं त्यांच्या मागणीकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे ससाणे यांनी सुमारे दोनशे मीटर लांबीचा सायकल ट्रॅक जेसीबीच्या सहाय्याने उखडून टाकला आहे. अनेक वेळा नेवदन देऊनही अडचण ठरणारा हा सायकल ट्रॅक महापालिकेकडून काढला जात नव्हता. त्यामुळे ही कृती करावी लागल्याचं ससाणे म्हणाले. पुणे-सोलापूर मार्गावरील उड्डाणपुलाच्या सुरुवातीला आणि कामधेनू सोसायटीसमोर हा सायकल ट्रॅक होता.
15 ते 16 वर्षापूर्वी बीआरटीच्या नावाखाली हा सायकल ट्रॅक बसवला होता. हा एकतर ओरिजिनल लेव्हलपेक्षा पाच इंच वर आहे. शिवाय रस्त्याच्या मधोमध आहे. त्यानंतर सर्व्हिस रोड मोठा सोडला आहे. मग क्ररेज कपॅसिटी कमी करुन त्यावेळी प्रशासनानं काय साधलं माहिती नाही. रोज सकाळ-संध्याकाळ आम्ही ट्राफिक जामला कंटाळलो आहोत. मग हा वापरात नसलेला सायकल ट्रॅक किती दिवस ठेवायचा, म्हणून तो काढून टाकला, असं ससाणे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हटलंय.
इतर बातम्या :
‘बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं म्हणून सांगतील’, महाविकास आघाडीवर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणारच, पालकमंत्री सुभाष देसाईंचं खासदार इम्तियाज जलील यांना प्रत्युत्तर
Yogesh Sasane removes bicycle track in Hadapsar made by pune Municipal Corporation