मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री आणि अमरावतीतील आमदार बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर बच्चू कडू यांच्या समर्थकांना काहीशी काळजी वाटत आहे. बच्चूभाऊंसाठी प्रार्थना करणाऱ्या एका लहानग्याचा ढसाढसा रडतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. (Video of Crying Boy Praising for COVID Positive Minister Bacchu Kadu goes Viral)
“देवा, बच्चू कडू भाऊले बरोबर निगेटिव्ह आणू दे, काहीच नको होऊ देऊ” असे हा चिमुरडा रडत देवाकडे प्रार्थना करताना दिसत आहे. खुद्द बच्चू कडू यांनीच हा व्हिडीओ शेअर केला आहे.
“बेटा मला काहीच नाही होणार, औषधीसोबत आपल्या शुभेच्छा व प्रेम आहे. मग मला काही होणार नाही. तू रडलास, तर मला बरं वाटणार नाही. लोकांनी हसावे म्हणूनच आम्ही आयुष्य खर्ची घालतो. खूप मोठा हो, सेवा कर” अशा शब्दात कडूंनी लेकराला धीर दिला. ‘आपला भिडू बच्चू कडू’ असा नारा देणाऱ्या बच्चू कडू यांच्या समर्थकांना ‘भाऊ’ जवळचे वाटत असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं.
बेटा मला काहीच नाही होणार, औषधी सोबत आपल्या शुभेच्छा व प्रेम आहे. मग मला काही होणार नाही तु रडला तर मला बर वाटणार नाही. लोकांनी हसावे म्हणूनच आम्ही आयुष्य खर्ची घालतो. खुप मोठा हो सेवा कर.. pic.twitter.com/K64KLd1fMQ
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) September 20, 2020
‘प्रहार जनशक्ती’ पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती शनिवारी ट्विटरवरुन दिली होती. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कृपया संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी.” असे आवाहन त्यांनी केले होते.
माझी कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली आहे. कृपया संपर्कात आलेल्या सर्वानी आपली तपासणी करुन घ्यावी.
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) September 19, 2020
ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चू कडू हे अमरावतीतील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार आहेत. ते ‘प्रहार जनशक्ती’ पक्षाचे अध्यक्ष आहेत. सत्तास्थापनेवेळी महाविकास आघाडी सरकारला त्यांनी पाठिंबा दर्शवला होता. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे जलसंपदा, शालेय शिक्षण, महिला आणि बाल विकास, कामगार या मंत्रालयांच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे. त्यांच्याकडे अकोल्याच्या पालकमंत्रिपदाचीही धुरा आहे.
कोरोनाची लागण झालेले ठाकरे सरकारमधील मंत्री
कॅबिनेट मंत्री
1. जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण मंत्री (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : एप्रिल 2020 – कोरोनामुक्त
2. अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 25 मे 2020 – कोरोनामुक्त
3. धनंजय मुंडे – सामाजिक न्याय मंत्री (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 12 जून 2020 – कोरोनामुक्त
4. अस्लम शेख – वस्त्रोद्योग मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 20 जुलै 2020 – कोरोनामुक्त
5. बाळासाहेब पाटील – सहकार मंत्री (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 15 ऑगस्ट 2020 – कोरोनामुक्त
6. सुनील केदार – दुग्धविकास मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 3 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
7. नितीन राऊत – ऊर्जा मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 18 सप्टेंबर 2020
8. हसन मुश्रीफ – ग्रामविकास मंत्री (राष्ट्रवादी) – 18 सप्टेंबर 2020
राज्यमंत्री
1. अब्दुल सत्तार – महसूल (शिवसेना) – कोरोनाची लागण : 22 जुलै 2020 – कोरोनामुक्त
2. संजय बनसोडे – पर्यावरण, रोहयो (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 2020 – कोरोनामुक्त
3. प्राजक्त तनपुरे – नगरविकास, ऊर्जा (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 7 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
4. विश्वजीत कदम – सहकार, कृषी (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 11 सप्टेंबर 2020
5. बच्चू कडू – शालेय शिक्षण (अपक्ष) – कोरोनाची लागण : 19 सप्टेंबर 2020
संबंधित बातम्या –
7 कॅबिनेट, 3 राज्यमंत्री, ठाकरे सरकारमधील ‘कोव्हिड योद्धे’ मंत्री
(Video of Crying Boy Praising for COVID Positive Minister Bacchu Kadu goes Viral)