Video : साताऱ्यातला ‘तो’ पाऊस आणि ‘ती’ निवडणूक; शरद पवारांकडून श्रीनिवास पाटलांचं तोंडभरून कौतुक

सातारा लोकसभा निवडणूक प्रचारात श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी पवारांनी मुसळधार पावसात घेतलेली ती सभा तर राष्ट्रीय पातळीवर गाजली. किंबहुना या सभेनं राज्यातील राजकीय वारं उलट्या दिशेनं फिरलं! याचीच आठवण आज शरद पवार यांनी पुन्हा एकदा काढली. निमित्त होतं महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त कृतज्ञता सोहळा.

Video : साताऱ्यातला 'तो' पाऊस आणि 'ती' निवडणूक; शरद पवारांकडून श्रीनिवास पाटलांचं तोंडभरून कौतुक
शरद पवार यांच्या हस्ते खासदार श्रीनिवास पाटील यांचा सत्कारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 9:35 PM

पुणे : 2019 ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक (Loksabha, Assembly Election) महाराष्ट्रातील कुणीही राजकारण प्रेमी विसरणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये आयारामांची लागलेली रांग आणि अशा स्थितीतही वयाच्या 78 व्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेला झंझावाती प्रचार आजही आठवतो. त्यातच सातारा लोकसभा निवडणूक प्रचारात श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांच्या प्रचारासाठी पवारांनी मुसळधार पावसात घेतलेली ती सभा तर राष्ट्रीय पातळीवर गाजली. किंबहुना या सभेनं राज्यातील राजकीय वारं उलट्या दिशेनं फिरलं! याचीच आठवण आज शरद पवार यांनी पुन्हा एकदा काढली. निमित्त होतं महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त कृतज्ञता सोहळा.

कृतज्ञता सोहळ्यात खासदार श्रीनिवास पाटील यांचा भव्य सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते करण्यात आला. त्यावेळी पवार म्हणाले की, सातारच्या एका निवडणुकीत टेन्शन आलं होतं. एकीकडे श्रीनिवास पाटील आणि दुसरीकडे उदयनराजे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. कुणाला तिकीट द्यायचं? श्रीनिवास पाटील म्हणाले हरकत नाही मी थांबतो. उदयनराजेंना तिकीट दिलं. एकदा निवडून आले, दोनदा निवडून आले, तीनदा निवडून आले. नंतर निवडून आल्यावर खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये गेले. मग आम्ही राजांना म्हणालो या आता. राजांच्या अंगात आलं. श्रीनिवास पाटील निवडून आले. शेवटी विचारांची बांधिलकी महत्वाची, असं पवार यावेळी म्हणाले.

‘आमचा पाटील गडी मागे राहत नाही’

त्याचबरोबर नृत्य करण्याचं काम असो, भाषण करण्याचं काम असो की राज्य चालवण्याचं काम असो. हा आमचा पाटील गडी मागे राहत नाही. त्याचा पुणेकरांनी सन्मान केला याचा आनंद आहे, अशा शब्दात पवारांनी खासदार श्रीनिवास पाटलांचं कौतुक केलं.

एसपी कॉलेजमध्ये श्रीनिवास पाटील यांची गाठ पडली ती कायमची

शरद पवार यांनी पवारांनी कॉलेज जीवनातला किस्से सांगितले. आम्ही कॉमर्स कॉलेजेला शिकायला होतो, देशातल मोठं कॉलेज होतं. तिथं मुली कमी होत्या. काही असल्यातरी त्या कॅम्पातल्या पारशी होत्या त्या इंग्लिश बोलायच्या मग आम्ही ग्रामीण भागातून आलेलो होतो काय बोलणार त्यांच्याशी….? असं शरद पवार म्हणाले म्हणून मग एसपी कॉलेज जवळ होत, अशा कामांना एसपी कॉलेज प्रसिध्द होत, तिथंच माझी आणि श्रीनिवास पाटीलची गाठ पडली ती कायमची, असं शरद पवार म्हणाले.

इतर बातम्या :

1999 ला मित्रानं राजीनामा देऊन जॅकेट आणि टोप्या शिवायला सांगितल्या तो म्हणजे शरद पवार : श्रीनिवास पाटील

Assembly Election 2022 : स्वतंत्र भारतात नरेंद्र मोदी सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान, अमित शाहांचा दावा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.