VIDEO: सुप्रिया सुळे, हरसिमरत कौर, स्मृती इराणींची फुगडी

मुंबई: मोदी सरकारने शुक्रवारी यंदाचं अंतरिम बजेट सादर केलं. बजेटनंतर अनेक महिला खासदारांनी एकत्र जेवण केलं. विविध पक्षाच्या महिला खासदार यावेळी एकत्र पाहायला मिळाल्या. जेवणानंतर थोडासा विरंगुळा म्हणून या महिला खासदारांनी पारंपारिक खेळाचा आनंद लुटला. केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार हरसिमरत कौर बादल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या […]

VIDEO: सुप्रिया सुळे, हरसिमरत कौर, स्मृती इराणींची फुगडी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

मुंबई: मोदी सरकारने शुक्रवारी यंदाचं अंतरिम बजेट सादर केलं. बजेटनंतर अनेक महिला खासदारांनी एकत्र जेवण केलं. विविध पक्षाच्या महिला खासदार यावेळी एकत्र पाहायला मिळाल्या. जेवणानंतर थोडासा विरंगुळा म्हणून या महिला खासदारांनी पारंपारिक खेळाचा आनंद लुटला.

केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार हरसिमरत कौर बादल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल, भाजप खासदार किरण खेर, द्रमुक खासदार कणीमोझी, केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल या सर्वजणी मिळून एकमेकींचा हात पकडून गिद्दा खेळताना दिसल्या.

यानंतर स्मृती इराणी आणि हरसिमरत कौर बादल यांनी फुगडीही खेळली. हरसिमरत कौर बादल यांनी हा व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर केला आहे.

“आयुष्याने आमच्यावर काल दुपारी जादू केली, दुपारच्या नियमित जेवणानंतर एक वेळ आली, तिने आम्हाला बालपणीची आठवण करुन दिली” असं हरसिमरत कौर यांनी म्हटलं

राजकीय नेते एकमेकांच्या विरोधात राजकारण करत असले तरी राजकारणापलिकडचेही संबंध असू शकतात, हे या व्हिडीओवरुन पुन्हा एकदा दिसून येतं. शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला. आज दुपारपर्यंत हा व्हिडीओ ट्विटरवर जवळपास 68 हजार लोकांनी पाहिला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.