Video: आपचा ताप आम्हाला नाही..गोपीनाथ मुंडेंना जे दिसलं ते काँग्रेसवाल्यांना कळालं नाही का? मुंडेंची भविष्यवाणी चर्चेत

| Updated on: Mar 12, 2022 | 7:42 AM

पण दिल्लीकर चतूर निघाले त्यांनी केंद्रात मोदींना ठेवलं तर दिल्ली केजरीवालांच्या हाती दिली. काँग्रेसच्या शीला दीक्षित यांची सद्दी संपली. काँग्रेसची संपली. त्याच काळात केजरीवाल कुणाला संपवणार अशी चर्चा सुरु झाली?

Video: आपचा ताप आम्हाला नाही..गोपीनाथ मुंडेंना जे दिसलं ते काँग्रेसवाल्यांना कळालं नाही का? मुंडेंची भविष्यवाणी चर्चेत
गोपीनाथ मुंडेंनी केलेली राजकीय भविष्यवाणी खरी ठरताना दिसतेय
Image Credit source: Social
Follow us on

भाजपानं उत्तर प्रदेशची लढाई जिंकली. त्याची मोठी चर्चा आहे. मोदी-योगीची (Modi Yogi Wave) लाट असल्याचीही चर्चा आहे. एवढच काय, 2024 ला पुन्हा मोदी आणि 2029 योगी अशा घोषणाही ऐकायला मिळतायत. पण ह्या सगळ्या चर्चांमध्ये एक चर्चा आहे ती आम आदमी पार्टीच्या (AAP) अरविंद केजरीवालांची. (Arvind Kejriwal) अवघ्या दहा वर्षात अरविंद केजरीवालांनी दुसरं राज्य जिंकलंय तेही स्पष्ट बहुमतासह. विशेष म्हणजे दिल्लीतली काँग्रेसची जी एकहाती सत्ता संपवली तीही अरविंद केजरीवालांनीच आणि आता पंजाबमधलं त्यांचं साम्राज्य नेस्ताबुत केलं तेही केजरीवालांनीच. म्हणजे केजरीवालांच्या उदयाचा तोटा भाजपला न होता तो काँग्रेसला झालेला स्पष्ट दिसतोय. विशेष म्हणजे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी याचं भाकित आधीच केलं होतं. तेच भाकित कालच्या निवडणुकीत खरं होताना दिसतंय.

काय म्हणाले होते गोपीनाथ मुंडे?
अरविंद केजरीवाल यांच्या आपनं दिल्लीत तीन वेळेस सत्ता मिळवली. अन्ना हजारेंनी मनमोहनसिंग सरकारविरोधात आंदोलन सुरु केलं. भ्रष्टाचारविरोधी हे आंदोलन बघता बघता देशभर पसरलं. काँग्रेसची दशकभराची सत्ता संपली. नरेंद्र मोदी यांचा उदय झाला. अभूतपुर्व अशा बहुमतासह मोदी देशाचे पंतप्रधान झाले. अन्नांच्याच आंदोलनातून काही नेतेही जन्माला आले. त्यापैकीच एक होती अरविंद केजरीवाल. त्यावेळेस काँग्रेसचे नेते केजरीवालांना निवडणुका का लढत नाहीत म्हणून खिजवायचे. आणि त्याचा उलटा परिणाम झाला. केजरीवालांनी आम आदमी पार्टीची स्थापना केली. त्यानंतर दिल्ली विधानसभेच्या निवडणुका लागल्या. केंद्रात मोदी असल्यामुळे सगळ्यांना वाटलं दिल्ली विधानसभेतही भाजपचच सरकार येणार. पण दिल्लीकर चतूर निघाले त्यांनी केंद्रात मोदींना ठेवलं तर दिल्ली केजरीवालांच्या हाती दिली. काँग्रेसच्या शीला दीक्षित यांची सद्दी संपली. काँग्रेसची संपली. त्याच काळात केजरीवाल कुणाला संपवणार अशी चर्चा सुरु झाली?


अनेकांना असं वाटायचं की

केजरीवालांमुळे भाजपचं नुकसान होणार. हाच प्रश्न त्यावेळेस पत्रकार निखिल वागळेंनी गोपीनाथ मुंडेंना एका मुलाखतीत विचारला. त्यावेळेस मुंडे म्हणाले होते-त्याचा फायदा भाजपालाही झालाय. भाजपच्या जागा 16 वरुन 32 झाल्या. भाजपच्या मतात दुप्पट वाढ झालेलीय. आता आपचा त्रास भाजपाला काही होणार नाही, आपचा ताप काँग्रेसला होईल. आपचा ताप आम्हाला नाही, काँग्रेसला होणार. काँग्रेस जिथं कमी होईल तिथं आप वाढेल. ते आम्हाला घटवू शकणार नाहीत.

हे सुद्धा वाचा:

Punjab New CM 2022: भगवंत मान 16 मार्च रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, केजरीवालांचा 13 मार्चला अमृतसरमध्ये रोड शो

Punjab Elections | अरविंद केजरीवालांनी विधानसभेचं ‘पंजाब हॉस्पिटल’ करुन टाकलं, कसं? हा बदल हवा हवासा!

Election Result 2022 Live: पंजाब जिंकणाऱ्या केजरीवालांविरोधात मोदींनी रणशिंग फुंकलं? मी विश्वास देतो की…