Video : नवनीत राणा आणि पोलीस अधिकाऱ्यांत बाचाबाची; आयुक्तांवरील शाईफेक प्रकरणावरुन अमरावतीत जोरदार राजकारण

अटकेतील आरोपींना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केलाय. या प्रकरणातील काही आरोपींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या आरोपींना भेटण्यासाठी नवनीत राणा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यावेळी त्यांची महिला पोलीस अधिकाऱ्याशी चांगलीच बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी नवनीत राणा चांगल्याच संतापल्या होत्या.

Video : नवनीत राणा आणि पोलीस अधिकाऱ्यांत बाचाबाची; आयुक्तांवरील शाईफेक प्रकरणावरुन अमरावतीत जोरदार राजकारण
नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये बाचाबाची
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 5:24 PM

अमरावती : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्यावरुन अमरावतीमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्याच्या कारणावरुन महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर (Pravin Ashtikar) यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार बुधवारी घडला. या प्रकरणात आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यासह 10 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशावेळी अटकेतील आरोपींना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केलाय. या प्रकरणातील काही आरोपींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या आरोपींना भेटण्यासाठी नवनीत राणा (Navneet Rana) रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यावेळी त्यांची महिला पोलीस अधिकाऱ्याशी चांगलीच बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी नवनीत राणा चांगल्याच संतापल्या होत्या.

नवनीत राणा शाईफेक प्रकरणातील आरोपींना भेटण्यासाठी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यावेळी पोलिसांकडून केवळ चार लोकांनीच रुग्णालयात प्रवेश करण्यास सांगितलं. यावरुन नवनीत राणा चांगल्याच संतापल्या. तेव्हा पोलीस अधिकारी आणि नवनीत राणा यांच्यात बाचाबाची झाली. पाटील मॅडम तुम्ही आवाज कमी करा. त्या रुग्णाच्या दोन्ही किडनी फेल आहेत, तुम्हाला माहिती नाही. आम्हाला माहिती आहे त्या रुग्णाची परिस्थिती काय आहे ती. आवाज कमी करा, थोडच बोला पण आवाज कमी करा. तुम्हाला माहिती नाही माझा आवाज किती आहे, पूर्ण रुग्णालय हलवून टाकेन मी. त्यावेळी पोलिस अधिकाऱ्याकडूनही तुम्हाला मी घाबरत नाही, असं उत्तर देण्यात आलं. तेव्हा तुम्हालाही मी घाबरत नाही, जनतेचं काम करत आहे, असं नवनीन राणा म्हणाल्याचं, या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

पोलीस ठाण्यात आरोपींची भेट नाकारली!

दरम्यान, शाईफेकीच्या प्रकारानंतर पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. या आरोपींना भेटण्यासाठी नवनीत राणा राजापेठ पोलीस ठाण्यात पोहोचल्या होत्या. त्यावेळी आरोपींशी बोलण्यास त्यांना परवानगी देण्यात आली नाही. पोलिसांनी निर्दोष लोकांना अटक केली आहे. त्यांना गुन्हेगाराप्रमाणे मारहाण करण्यात येत आहे. रवी राणा यांचा नाव सांगा असा दबाव पोलीस आरोपींवर टाकत आहेत, असा आरोप नवनीत राणा यांनी केलाय. तसंच मारहाणीची तक्रार आपण पोलीस आयुक्त आणि मानवाधिकार आयोगाकडे करणार असल्याची माहितीही त्यांनी दिलीय.

महापालिका आयुक्तांनीही भेट दिली नाही!

तसंच नवनीत राणा या महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर पोहोचल्या होत्या. मात्र तब्येतीचे कारण देत आयुक्तांनी त्यांची भेट नाकारली. त्यावेळी आयुक्तांच्या बंगल्यावर तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मी आयुक्तांचे सांत्वन करायला आले होते. शाईफेक प्रकरणात मी त्यांच्याकडून माहिती घेणार होते. मात्र त्यांनी माझी भेट नाकारून माझा नाही तर जनतेचा अपमान केला, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली आहे.

इतर बातम्या :

VIDEO : सोलापूरमध्ये व्यापाऱ्याकडे सिनेस्टाईल खंडणीची मागणी, घटना कॅमेऱ्यात कैद

कोण आहेत मुंबईतले चहावाले राजीव साळुंखे ज्यांना थेट पुण्यातलं कोविड सेंटर चालवायला मिळालं?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.