Vidhan Parishad Election : 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात! विधान परिषदेतही राज्यसभेचंच चित्र की महाविकास आघाडी भाजपला रोखणार? जाणून घ्या परिषदेचं गणित

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आता 11 उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे राज्यसभेप्रमाणेच 10 व्या जागेसाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. अशावेळी विधान परिषदेतही राज्यसभेचंच चित्र दिसणार की महाविकास आघाडी भाजपला रोखण्यात यशस्वी ठरणार? अशी चर्चा सुरु झालीय.

Vidhan Parishad Election : 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात! विधान परिषदेतही राज्यसभेचंच चित्र की महाविकास आघाडी भाजपला रोखणार? जाणून घ्या परिषदेचं गणित
महाराष्ट्र विधान भवनImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 4:54 PM

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) भाजपनं महाविकास आघाडी पर्यायानं शिवसेनेला जोरदार झटका दिलाय. आता विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जून रोजी मतदान पार पडणार आहे. आज उमेदवारी अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस होता. विधान परिषदेसाठी भाजपकडून सहा उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. मात्र, आज सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेसही आपला दुसरा उमेदवार मागे घेणार असलं बोललं जात होतं. मात्र, काँग्रेसनं दोन्ही उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) 10 जागांसाठी आता 11 उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे राज्यसभेप्रमाणेच 10 व्या जागेसाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. अशावेळी विधान परिषदेतही राज्यसभेचंच चित्र दिसणार की महाविकास आघाडी भाजपला रोखण्यात यशस्वी ठरणार? अशी चर्चा सुरु झालीय.

प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी 27 मतांची गरज

विधान परिषद निवडणुकीत विजयी होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 27 मतांची गरज आहे. अशावेळी भाजप आणि मित्रपक्ष मिळून त्यांच्याकडे 113 इतकं संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपच्या चार जागा सहज निवडून येऊ शकतात. मात्र, पाचव्या जागेसाठी भाजपला 22 मतांची गरज लागणार आहे. राज्यसभेत भाजपला पहिल्या पसंतीची 123 मतं मिळाली आहेत. विधान परिषद निवडणुकीत गुप्त मतदान पद्धती आहे. त्यामुळे त्यात अजून भर पडू शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र, असं झाल्यास महाविकास आघाडीला त्याचा मोठा फटका सहन करावा लागू शकतो.

तर महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी होण्यात कोणतीही अडचण नाही. मात्र काँग्रेसचा एकच उमेदवार निवडून येईल इतकं संख्याबळ आहे. काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येत असली तरी त्यांच्याकडे पहिल्या पसंतीची मतं शिल्लक राहत आहेत. दुसऱ्या उमेदवारीसाठी त्यांना 12 मतांची गरज भासणार आहे.

हे सुद्धा वाचा

सदाभाऊ खोत यांचा उमेदवारी अर्ज मागे

भाजपकडून एकूण सहा उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. मात्र, आता भाजप समर्थक सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेनंतर सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे यांनीही आपला डमी अर्ज मागे घेतला आहे.

भाजप उमेदवार

>> प्रवीण दरेकर >> राम शिंदे >> उमा खापरे >> श्रीकांत भारतीय >> प्रसाद लाड

काँग्रेस उमेदवार

>> भाई जगताप >> चंद्रकांत हंडोरे

शिवसेना उमेदवार

>> सचिन अहिर >> आमशा पाडवी

राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार

>> रामराजे निंबाळकर >> एकनाथ खडसे

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.