Vidhan Parishad Election : विधान परिषदेसाठी भाजपनं फिल्डिंग लावली, कोणते 3 नेते रडारवर? भाजपच्या गोटातली इनसाईड स्टोरी

राज्यसभा निवडणुकीत सेनेचा ऊमेदवार हरल्यानंतर भाजप विधान परिषदेत सगळ्या 6 जागा निवडून आणण्यावर ठाम आहे.  मविआ नेत्यांनी आपलं नामांकन परत घ्यावं यासाठी भाजप एक्शन मोडमध्ये आली आहे.

Vidhan Parishad Election : विधान परिषदेसाठी भाजपनं फिल्डिंग लावली, कोणते 3 नेते रडारवर? भाजपच्या गोटातली इनसाईड स्टोरी
चाणक्य! गेमचेंजर, बाजीगर की नागपूरचं सॉलिड पोट्टं, आधी बिहार, मग गोवा आणि आता राज्यसभा, फडणवीसांची विजयी हॅट्रिकImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 4:49 PM

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha Election) गनिमी काव्यानं महाविकास आघाडीला (Mahavias Aghadi) शिकस्त दिल्यानंतर आता भाजपचे (BJP) हौसले हे बुलंद झाले आहेत. भाजपने विधान परिषदेसाठीही जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी पडणवीसांनी आत्तापासून जाळं टाकायला सुरूवात केली आहे. महविकास आघाडीचे काही नेते पुन्हा जाळ्यात अडकवण्याचा प्लॅन भाजपच्या गोटात तयार झाला आहे. अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. राज्यसभा निवडणुकीत सेनेचा ऊमेदवार हरल्यानंतर भाजप विधान परिषदेत सगळ्या 6 जागा निवडून आणण्यावर ठाम आहे.  मविआ नेत्यांनी आपलं नामांकन परत घ्यावं यासाठी भाजप एक्शन मोडमध्ये आली आहे. त्यासाठी भाजपने नेत्यांची फळीही तयार केली आहे. त्यामुळे पुन्हा राजकारणाच तवा चांगलाच तापला आहे. भाजपने सुरूवातील पाच उमेदरी घोषित केल्या त्यानंतर सदाभाऊ खोत यांना समर्थन देत सहावा उमेदवारही दिला आहे.

फडणवीसांनी नेत्यांना काय आदेश दिले?

त्यामुळे  प्रविण दरेकर , चंद्रशेखर बावनकुळेंवर पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काही करून ऊमा खापरे, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांना निवडून आणावे हा पक्षाचा प्रतिष्ठेचा प्रश्न अशा सूचना फडणवीसांनी नेत्यांना दिल्या आहेत. विधानपरिषदेच्या जागेचं नामांकन परत घेण्यासाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी उरला आहे सोमवारी नामांकन परत घेण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्यामुळे आता या दोन दिवसात राजकारणाची सुत्रं ही वेगाने फिरणार आहेत. एकनाथ खडसे, सचिन अहीर आणि भाई जगताप यांचं भवितव्य अंधांतरीत असल्याची चर्चा भाजपच्या पहिल्या फळीत आहे. हे ३ नेते भाजपच्या रडारवर असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

विधान परिषदेसाठी कुणाकडून कोण मैदानात?

  1. प्रवीण दरेकर, भाजप उमेदवार
  2. राम शिंदे, भाजप उमेदवार
  3. श्रीकांत भारतीय, भाजप उमेदवार
  4. उमा खापरे, भाजप उमेदवार
  5. प्रसाद लाड, भाजप उमेदवार
  6. सदाभाऊ खोत, भाजप उमेदवार

सेनेकडून दोन उमेदवार

  1. सचिन अहिर, शिवसेना
  2.  आमशा पाडवी, शिवसेना

काॅंग्रेसचेही दोन उमेदवार मैदानात

  1. चंद्रकांत हंडोरे
  2. भाई जगताप

राष्ट्रवादी काँग्रेस

  1. रामराजे नाईक निंबाळकर
  2. एकनाथ खडसे

राज्यसभेचा प्लॅन विधान परिषदेत चालणार?

आता अर्ज मागे घेण्याची तारीख 13 जून 2022 ही असणार आहे. मात्र भाजपचं सध्याचं सख्याबळ पाहिल्यास त्यांचे पाच उमेदवार निवडून येऊ शकतात अशी स्थिती आहे. मात्र पुरेसं सख्यबळ नसतानाही भाजपने राज्यसभेला सहावा उमेदवार निवडून आणलाच आणि महाविकास आघाडीला शह दिला. तोच प्लॅन भाजपचा या निवडणुकीत असणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला आता दुसरा झटका देण्यात भाजप आणि फडणवीस यशस्वी होणार का? हे काही दिवसातच कळेल.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.