Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : ‘हे आम्हालाच माहीत आहे’ फुटलेल्या मतांवर देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान!

राज्यसभेच्या निवडणुकीत 123 मतं घेतली होती. आता 134 मतं घेतली आहेत. मी पहिल्यापासून सांगत होतो महाविकास आघाडीमध्ये प्रचंड नाराजी आहे.

Devendra Fadnavis : 'हे आम्हालाच माहीत आहे' फुटलेल्या मतांवर देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान!
'हे आम्हालाच माहीत आहे' फुटलेल्या मतांवर देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान! Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 8:51 AM

मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाविकास आघाडीचे (MVA) सरकार स्थापण झाल्यापासून त्यांच्यात नाराजी असल्याचं म्हणतं आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत देखील हे पाहायला मिळालं. कारण भाजपने (BJP) महाविकास आघाडीतील काही अपक्ष उमेदवारांची मतं मिळवून आपले उमेदवार विजयी केले. तसेच राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांचा तिसरा उमेदवार निवडून आणला. विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील फडणविसांचा करिश्मा पुन्हा पाहायला मिळाला. महाविकास आघाडी आणि अपक्ष आमदारांची मतं घेऊन फडणवीसांनी आपले पाचही उमेदवार निवडून आणले. त्यामुळे महाविकास आघाडीत किती नाराजी आहे पुन्हा चव्हाट्यावर आले आहे. निकाल जाहीर झाल्यापासून शिवसेनेचे मोठे नेते एकनाथ नाराज असल्याचे समजते आहे. कालपासून त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल असल्याने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. तसेच हे नाराजीनाट्य शिवसेनेला अधिक भारी पडणार असल्याची देखील चर्चा आहे.

विधान परिषदेच्या निकालानंतर फडणविसांची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय, की, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पाचही उमेदवार निवडून आलेत. राज्यसभेच्या निवडणुकीत 123 मतं घेतली होती. आता 134 मतं घेतली आहेत. मी पहिल्यापासून सांगत होतो महाविकास आघाडीमध्ये प्रचंड नाराजी आहे. समन्वय नाहीये. सरकारवर आमदारांचा विश्वास नाहीये आणि म्हणून आमच्या पाचव्या उमेदवाराला आमदार मतं देतील, हे आम्हाला माहीत होतं. पाचव्या उमेदवारासाठी आमच्याकडे एकही मत नव्हतं. तरीही आम्ही काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांपेक्षा जास्त मतं घेतली. तर उरलेल्या चार उमेदवारांनी भरघोस मतं घेतली. लक्ष्मण जगपात आणि मुक्ता टिळक यांनी या विजयाला हातभार लावला. महाराष्ट्रामध्ये आज नव्या परिवर्तनाची नांदी पाहायला मिळतेय. सरकारविरोधातला असंतोष बाहेर आल्याचं निकालानं दाखवून दिलं. कुणाची किती मतं फुटलेली दिसतात हा तुमचा कयास आहे. सत्तेतली मतं किती आहेत, हे आम्हाला माहीत आहे. आम्हाला मतं दिलेल्या सगळ्या पक्षातल्या आमदारांचे आभार मानतो. अपक्षांसह छोट्या पक्षांचे आभार मानतो.

कॉंग्रेसचे आमदार दिल्लीला जाणार

राज्य सभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभेतही असाचं निकाल असं भाजपच्या अनेक नेत्यांनी म्हटलं होतं. भाजपचे पाचही उमेदवार निवडून आल्याने महाविकास आघाडीतील आमदारांचं नाराजी नाट्य समोर आलं आहे. कॉंग्रेसचे आमदार देखील आज दिल्लीा जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा

त्यामुळे महाविकास आघाडीत नाराजी आहे.

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.