Vidhan Parishad Election : मित्रपक्षांना धोका का दिला? परिषदेची उमेदवारी डावलल्यानं शिवसंग्रामचे विनायक मेटे आक्रमक, फडणवीसांना भेटणार

आता शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे विरोक्षी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. अर्थातच विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्यानं विनायक मेटे नाराज आहेत. मित्रपक्षांना धोका का दिला? असा थेट सवाल ते फडणवीसांना करणार आहेत.

Vidhan Parishad Election : मित्रपक्षांना धोका का दिला? परिषदेची उमेदवारी डावलल्यानं शिवसंग्रामचे विनायक मेटे आक्रमक, फडणवीसांना भेटणार
विनायक मेटे यांना विधान परिषद नाकारलीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 5:46 PM

 मुंबई : राज्याच्या राजकारणात आधीच राज्यसभेच्या निवडणुकीने (Rajyasabha Election) रान पेटवलं असताना आज विधान परिषदेसाठी (Vidhan Parishad Election)जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या यादी एकापाठोपाठ एक आल्या. या यादीतली नावं ही अनेकांना दे धक्का तर काहींना सुखद धक्का देणारी होती. कारण या यादीतून काही बडी नावं वगळण्यात आली आहेत. भाजपकडून (BJP) जी यादी जाहीर झाली आहे. यातलं चित्रही काहीसं असेच होतं. पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, तसेच शिवसंग्रामचे विनायक मेटे यांना उमेदवारी न मिळाल्याने पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहेत. त्यात आता शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे विरोक्षी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. अर्थातच विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्यानं विनायक मेटे नाराज आहेत. मित्रपक्षांना धोका का दिला? असा थेट सवाल ते फडणवीसांना करणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या संघटनेचे काही सदस्यही असणार आहेत.

मेटे वेगळा रस्ता धरणार?

गेल्या अनेक दिवसांपासून विनायक मेटे आणि त्यांची संघटना ही भाजपकडून महाविकास आगाडीविरोधात जोरदार खिंड लढवत होती. अनेक मुद्दे मेटे यांनी उचलून धरले होते. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून विनायक मेटे यांनी सरकारला वारंवार सवाल करत घेरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तरीही यावेळी मेटेंच्या हाती काही लागलं नाही, त्यामुळे आता मेटे पुढची भूमिका काय घेणार? तसेच नारजी दूर न झाल्यास मेटे भाजपपासून फारकत घेऊन वेगळा रस्ता धरणार का? अशा सवालही आता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

सादाभाऊ खोत, पंकजा मुंडे यांच्याही पदरी निराशा

विधान परिषदेची निवडणूक लागल्यापासून पंकजा मुंडे आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांची नावं ही सतत चर्चेत राहिली. मात्र प्रत्यात यादी आल्यावर त्या यादीत त्यांची नावं नव्हती. त्यामुळे पंकजा मुंडे यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर हल्लाबोल चढवणारे सदाभाऊ खोत यांनाही यावेळी डावलण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्याही पदरी काही आलं नाही.

राम शिंदे यांना मात्र संधी

गेल्या निवडणुकीत भाजपच्या काही मंत्र्यांचा पराभव झाला. त्यात कर्जत जामखेडचे आमदार राम शिंदे यांनाही रोहित पवार यांचं आव्हान पेललं नाही. त्याचाही विधानसभा निवडणुकीत दारून पराभव झाला. मात्र आता विधान परिषदेवर त्यांना संधी देत राष्ट्रवादीसमोर कर्जत जामखेडमधून एक सक्षम पर्याय तयार करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.