Vidhan Parishad Election : विधान परिषदेत भाजपला क्रॉस मतदानाचा धोका, कॉंग्रेस राष्ट्रवादीची मतांसाठी धावाधाव
भाजपला 135 मतांची गरज आहे. त्यांना मतांची जुळवाजुळव करण्यासाठी अधिक मतांची गरज आहे. त्यामुळे त्यांनी देखील छोट्या पक्षांचे आमदार आणि अपक्ष आमदारांना संपर्क साधायला सुरुवात केली आहे.
मुंबई – राज्यसभेची झालेली नाट्यमय निवडणुक अवघ्या देशाने मध्यरात्रीपर्यंत पाहिली, त्यामध्ये भाजपला (BJP) आपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यात यश आलं. त्यानंतर भाजपाने मोठा जल्लोष साजरा केला. तसेच विधान परिषदेच्यावेळी देखील असंच होईल असं भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे होणाऱ्या विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad) निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होणार असल्याने सर्वात अधिक धोका भाजपाला वाटू लागला आहे. कारण सोमवारी होणारं विधान परिषदेचं मतदान हे गुप्त पद्धतीने असणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने आपली कंबर कसायला सुरूवात केली आहे. कॉंग्रेस (Congress), राष्ट्रवादीकडे दुसरी जागा निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी अनेक आमदारांशी संपर्क साधला आहे. होणाऱ्या निवडणुकीत पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी उमेदवारांना छोट्या पक्षांचे आमदार आणि अपक्ष आमदारांवर सगळ्यांची भिस्त असल्याचं म्हटलं जात आहे.
कॉंग्रेसचे दोन आमदार या निवडणुकीत उभे आहेत
राज्यसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेल्या चातुर्यामुळे भाजपला तिसरी जागा जिंकता आली. कारण तिथं मर्यादीत कोटा असल्याने इतरत्र मतदान झालं नाही. पण विधानपरिषदेच्या निवडणुकीत गुप्त मतदान होणार असल्याने भाजपचे अनेक आमदार फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. भाजपमध्ये सुध्दा अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तुमचं मतदान कुणाला होत आहे हे समजेल अशी व्युहरचना भाजपकडून आखली जात आहे. कॉंग्रेसचे दोन आमदार या निवडणुकीत उभे आहेत. भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे,त्यांच्याकडे 44 आमदारांचे संख्याबळ आहे. या दोन उमेदवारांना पहिल्या फेरीत निवडून आणण्यासाठी कॉंग्रेसला दहा अधिक मतांची गरज आहे. पहिल्या फेरीत अधिक मतं मिळायला हवीत यासाठी कॉंग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
भाजपला 135 मतांची गरज आहे
भाजपला 135 मतांची गरज आहे. त्यांना मतांची जुळवाजुळव करण्यासाठी अधिक मतांची गरज आहे. त्यामुळे त्यांनी देखील छोट्या पक्षांचे आमदार आणि अपक्ष आमदारांना संपर्क साधायला सुरुवात केली आहे. सध्या भाजपकडं 106 आमदार असून त्यांना पाचवा उमेदवार विजयी करण्यासाठी सर्व मतं बाहेरून आणवी लागणार आहेत. अधिक जागा जिंकण्यासाठी भाजपने आतापासून आकडेमोड करायला सुरूवात केली असून मोठ्या नेत्यांनी आमदारांशी संपर्क साधला असल्याची माहिती मिळाली आहे.
राष्ट्रवादीकडून देखील दोन उमेदवार रिंगणात
राष्ट्रवादीकडून देखील दोन उमेदवार आहेत. न्यायालयाने अनिल देखमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारल्याने राष्ट्रवादीची दोन मते कमी झाली आहेत. एकनाथ खडसे यांना पहिल्या फेरीत निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीला अतिरिक्त मतदानाची गरज आहे. अपक्ष आमदारांनी राज्यसभेच्या निवडणुकीच्यावेळी अत्यंत महत्त्व आलं होतं.
तसेच ते विधान परिषदेच्या निवडणुकीच्यावेळी देखील निर्माण झालं आहे.