मुंबई : काँग्रेसने दोन जागांचा आग्रह सोडल्याने विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. मात्र तूर्तास निवडणुकीसाठी एकूण 12 उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले आहेत. भाजपने सहा, तर राष्ट्रवादीने तीन उमेदवारी अर्ज भरले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही सहकुटुंब हजेरी लावत उमेदवारी अर्ज दाखल केला. (Vidhan Parishad Candidature Form)
भाजप चार, शिवसेना दोन, राष्ट्रवादी दोन आणि काँग्रेस एका जागेसाठी निवडणूक लढवणार आहे. मात्र राष्ट्रवादीने एक तर भाजपने दोन अतिरिक्त असे डमी उमेदवार अर्ज सादर केले. अर्ज छाननी प्रक्रिया झाल्यानंतर ते आपापली उमेदवारी मागे घेतील. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांची लगबग सुरु होती.
डमी उमेदवार कोण?
राष्ट्रवादी काँग्रेसकडून किरण पावसकर यांनी डमी उमेदवार अर्ज सादर केला. तर भाजपकडून संदीप लेले आणि रमेश कराड यांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. हेसुद्धा डमी उमेदवार आहेत.
कोणत्या पक्षाकडून किती उमेदवारी अर्ज?
भाजप – 6
राष्ट्रवादी – 3
शिवसेना – 2
काँग्रेस 1
VIDEO : Breaking | विधानपरिषदेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी अर्ज दाखलhttps://t.co/dV8zWeoX0z
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 11, 2020
कोणत्या पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण?
उद्धव ठाकरे – शिवसेना
निलम गोऱ्हे – शिवसेना
राजेश राठोड – काँग्रेस
राजकिशोर मोदी – काँग्रेस
(Vidhan Parishad Candidature Form)
शशिकांत शिंदे – राष्ट्रवादी
अमोल मिटकरी – राष्ट्रवादी
रणजितसिंह मोहिते पाटील – भाजप
गोपीचंद पडळकर – भाजप
प्रवीण दटके – भाजप
डॉ. अजित गोपछेडे – भाजप
काँग्रेसने दोन जागांचा आग्रह सोडल्याने विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्गही मोकळा झाला. महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती आणि मुख्यमंत्र्यांचा आदर करत काँग्रेसने आपला एक उमेदवार मागे घेऊन एकाच जागेवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीचे पाच, तर भाजपचे चार उमेदवार बिनविरोध विधानपरिषदेवर निवडून जाणार असल्याचं काल (रविवारी) स्पष्ट झालं.
कुणाचं संख्याबळ काय?
सध्या ज्या जागा रिक्त झाल्यात त्यात भाजपच्या 3, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3, काँग्रेसच्या 2 आणि शिवसेनेची 1 अशा एकूण 9 जागांचा समावेश आहे. संख्याबळाचा विचार केला तर महाविकास आघाडीच्या 5 आणि भाजपच्या 3 जागा सहज निवडून येतील. तर मित्रपक्षांच्या साथीने चौथी जागाही भाजप जिंकू शकतो.
पक्षीय बलाबल लक्षात घेता भाजपकडे 105, शिवसेनेकडे 56, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54, काँग्रेसचे 44, बहुजन विकास आघाडी 3, समाजवादी पार्टी 2, एमआयएम 2, प्रहार जनशक्ती 2, मनसे 1, माकप 1, शेतकरी कामगार पक्ष 1, स्वाभिमानी पक्ष 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1, जनसुराज्य पक्ष 1, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1, अपक्ष 13 आमदारांचा समावेश आहे. त्यातून निवडून येण्यासाठी एका जागेसाठी 29 मतांची गरज आहे.
संबंधित बातम्या :
MLC Polls | विधानपरिषदेच्या नऊ रिक्त जागा, दहा उमेदवार, कोणत्या पक्षाकडून कोणाला तिकीट?
MLC Polls | विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीचे दोन उमेदवार जाहीर
MLC Polls | असंच चालू राहिलं, तर मी निवडणूकच लढवणार नाही, उद्धव ठाकरेंचा कॉंग्रेसला निरोप : सूत्र
MLC Polls | राष्ट्रवादीच्या पुढे काँग्रेसचं पाऊल, दुसरा उमेदवारही जाहीर, विधानपरिषदेचं गणित बदलणार
खडसे, बावनकुळे आणि पंकजा मुंडे स्वतःच स्वतःला समजावून सांगतील : चंद्रकांत पाटील
MLC Polls : ‘मोदी गो बॅक’ म्हणणाऱ्यांना उमेदवारी, एकनाथ खडसे खवळले
MLC Polls | मुंडे, खडसे, तावडे, बावनकुळेंच्या नावावर फुली, भाजपचे चार उमेदवार जाहीर
MLC Polls | काँग्रेस सहाव्या जागेसाठी आग्रही, मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार?
(Vidhan Parishad Candidature Form)