विधिमंडळ पावसाळी अधिवेशन Live | विधानपरिषद : उपसभापती पदाची निवडणूक जाहीर
अधिवेशनाच्या दोन्ही दिवशी सर्वांनी हॅन्डग्लोज, मास्क लावून फिरले पाहिजे. फेस शील्ड देखील बंधनकारक करण्यात आले आहे.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेलं यंदाचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. दोन दिवस ( 7 आणि 8 सप्टेंबर) चालणाऱ्या या अधिवेशनात कोव्हिड19 चे संकट लक्षात घेत प्रत्येक आमदाराची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. आमदारांना मास्क, फेस शील्ड, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज असे साहित्य दिले गेले आहे. त्यामुळे विधिमंडळात ‘मास्कधारी’ सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर बरसताना दिसतील. (Vidhansabha Rainy Session Day 1 Live Update)
[svt-event title=”विधानपरिषद : उपसभापती पदाची निवडणूक जाहीर” date=”07/09/2020,1:44PM” class=”svt-cd-green” ] विधानपरिषद : उपसभापती पदाची निवडणूक जाहीर, सभापती रामराजे निंबाळकर यांची घोषणा, उद्या (मंगळवारी) होणार निवडणूक [/svt-event]
[svt-event title=”काही जण खुर्चीसाठी चांगलं बोलतात, नंतर रात गई बात गई : मुख्यमंत्री” date=”07/09/2020,12:19PM” class=”svt-cd-green” ]
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या शोक प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ‘मातोश्री’वर पहिली भेट, त्यांचा व्यासंग दांडगा, कुठल्याही पक्षात शत्रू नव्हते, मुंबईत भेटायला बोलावलं, मनाचा मोठेपणा होता, नाहीतर काही जण खुर्चीसाठी चांगलं बोलतात, नंतर रात गई बात गई : मुख्यमंत्री pic.twitter.com/p2r66NcwrA
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 7, 2020
[/svt-event]
[svt-event title=” विधेयक रेटणे हा चुकीचा पायंडा : फडणवीस ” date=”07/09/2020,11:40AM” class=”svt-cd-green” ]
LIVE संख्याबळाच्या आधारे विधेयक रेटणे चुकीचं, हा चुकीचा पायंडा आम्ही सहन करणार नाही, ग्राम पंचायत प्रशासक नेमण्याच्या विधेयकावर देवेंद्र फडणवीसांचा जोरदार आक्षेप https://t.co/ImprYhMJl7 @Dev_Fadnavis @mrhasanmushrif @Ksbsunil pic.twitter.com/fbwNjU0qTg
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 7, 2020
[/svt-event]
[svt-event title=”बिल वेगळं, विरोधीपक्षांनी गल्लत करु नये : अजित पवार ” date=”07/09/2020,11:38AM” class=”svt-cd-green” ] हे बिल वेगळं आहे, कोर्टात निकाल लागला तर तो पाळला जाईल, विरोधी पक्षांनी याची गल्लत करु नये : अजित पवार [/svt-event]
[svt-event title=” मुश्रीफांना प्रशासक नेमण्याची घाई : फडणवीस” date=”07/09/2020,11:36AM” class=”svt-cd-green” ] मुश्रीफांना ग्राम पंचायतीवर प्रशासक नेमण्याची घाई, पण नियमबाह्य होऊ देणार नाही : फडणवीस [/svt-event]
[svt-event title=”हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण ” date=”07/09/2020,11:23AM” class=”svt-cd-green” ]
हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण – राज्यपाल निवडताना काही जाहिरात देता का? जो सुटेबल असेल तो व्यक्ती नेमतात, खासगी व्यक्ती आम्ही नेमत नाही, सरपंचांना मुदतवाढ देता येत नाही, तसा नियम नाही @mrhasanmushrif @Dev_Fadnavis @Ksbsunil https://t.co/LNawF8PypM
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 7, 2020
[/svt-event]
[svt-event title=”मुश्रीफ यांच्या विधेयकाला फडणवीसांचा आक्षेप” date=”07/09/2020,11:20AM” class=”svt-cd-green” ]
LIVETV- ग्रामपंचायत सुधारणा विधेयकाला देवेंद्र फडणवीस यांचा आक्षेप, कोर्टात सुनावणी असताना हे विधेयक आणू नका, कोर्टाच्या विरोधात सरकार भूमिका घेत आहे, कोर्टानं जो निर्णय दिलाय त्यानुसार नियुक्ती करा, फडणवीसांची मागणी https://t.co/ImprYhMJl7 @Dev_Fadnavis pic.twitter.com/VgCmGFYNyT
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 7, 2020
[/svt-event]
[svt-event title=”GST सुधारणा विधेयक आवाजी मतदानाने मंजूर” date=”07/09/2020,11:15AM” class=”svt-cd-green” ]
#विधिमंडळ_पावसाळी_अधिवेशन : अजित पवार यांनी GST सुधारणा विधेयक मांडले, आवाजी मतदानाने विधेयक मंजूर https://t.co/Sy173UgkpO @AjitPawarSpeaks pic.twitter.com/cgqGQUlnoC
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 7, 2020
[/svt-event]
[svt-event title=”मराठवाड्यातील भाजप आमदारांची अधिवेशनापूर्वी घोषणाबाजी” date=”07/09/2020,10:57AM” class=”svt-cd-green” ]
#विधानसभा_पावसाळी_अधिवेशन LIVETV | वैद्यकीय क्षेत्रातील प्रादेशिक आरक्षण रद्द करण्याची मागणी, मराठवाड्यातील भाजप आमदारांची अधिवेशनापूर्वी घोषणाबाजी 70 : 30 टक्के आरक्षण रद्द करण्याची मागणी https://t.co/FGyDvzB7sw pic.twitter.com/mUJ9Jsep1k
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 7, 2020
[/svt-event]
[svt-event title=”उद्धव ठाकरे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस दाखल” date=”07/09/2020,10:50AM” class=”svt-cd-green” ]
Vidhansabha Rainy Session LIVETV | विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस दाखल, पहा लाईव्ह https://t.co/D2qv4eGIHN pic.twitter.com/s0aAG71b9g
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 7, 2020
[/svt-event]
आतापर्यंतची सर्व अधिवेशने विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांच्या उपस्थितीत सत्ताधारी आणि विरोधकांमधील प्रश्नोत्तरांच्या जुगलबंदीमुळे गाजत असत. मात्र यावेळी सुरु होणारे पावसाळी अधिवेशन अध्यक्षांविना पार पडेल, असे होण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. कोरोनाची लागण झाल्याने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार नाहीत.
कोरोना चाचणी निगेटिव्ह येणाऱ्या आमदारांनाच सभागृहात प्रवेश दिला जाईल. सहव्याधी (कोमॉर्बिडीटी) असलेल्या आमदारांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अधिवेशनाच्या दोन्ही दिवशी सर्वांनी हॅन्डग्लोज, मास्क लावून फिरले पाहिजे. फेस शील्ड देखील बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनामुळे एकत्र येण्याला बंधने आहेत. त्यामुळे सरकारच्या वतीने होणारा चहापानाचा कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला होता.
विरोधक कोणत्या मुद्द्यांवर घेरणार?
कोव्हिडच्या संकटामध्ये अनेकांचा मृत्यू झाला, तरीही शासनाचं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विरोधीपक्ष कोरोना, कायदा सुव्यवस्था, शेती, शिक्षण या विषयावर विरोधीपक्ष सरकारला जाब विचारणार असल्याचं सांगितलं जात आहे.
अधिवेशन कालावधी केवळ दोन दिवसांचा असल्याने या अधिवेशनात प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी नाहीत. यावेळी अधिवेशनात पहिल्या दिवशी दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि काही सदस्यांच्या निधनाचे शोक प्रस्ताव चर्चेला येणार आहेत. त्यानंतर सरकारच्या वतीने काही विधेयके मांडली जाणार आहेत. तसेच आर्थिक बिले पास करण्यासाठी अधिवेशन घेण्यात येत असल्याचे सत्ताधारी म्हणत आहेत. (Vidhansabha Rainy Session Day 1 Live Update)
केवळ दोन दिवस चालणारे हे अधिवेशन अध्यक्षांच्या अनुपस्थितीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. कालावधी कमी असला तरी सत्ताधाऱ्यांचा कल हा आर्थिक आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याकडे आहे. मात्र विरोधक दोन दिवस का होईना वेगवेगळ्या मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणतील हे मात्र निश्चित.
VIDEO : पावसाळी अधिवेशन पहिल्यांदाच अध्यक्षांविना, अधिवेशनात विरोधक आक्रमक होणारhttps://t.co/sMdUM1GyPp
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 6, 2020
संबंधित बातम्या :
पावसाळी अधिवेशन दोन दिवसांवर असताना विधानसभा अध्यक्षांना कोरोना, नाना पटोले होम क्वारंटाईन
पावसाळी अधिवेशन | कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास आमदारांना विधिमंडळात प्रवेशबंदी
(Vidhansabha Rainy Session Day 1 Live Update)