Vijay Kumar Gavit: विजय कुमार गावित यांची आतापर्यंतची कारकीर्द, भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे होते चर्चेत

डॉ. विजयकुमार गावित यांचा जन्म नंदुरबार जिल्ह्यातील नटावद या  गावी 22 जुलै 1955 साली झाला. वडील शिक्षकी पेशात होते. वडिलांनी जनता दलाच्या तिकिटावर निवडून येत काँग्रेसला पराभव केले होते. विजयकुमार गावित हे भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे चर्चेत होते.

Vijay Kumar Gavit: विजय कुमार गावित यांची आतापर्यंतची कारकीर्द, भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे होते चर्चेत
विजय कुमार गावित Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 3:40 PM

विजय कुमार गावित (Vijay Kumar Gavit) यांची शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री पदासाठी (Cabinet Minister) वर्णी लागली आहे. गावित  हे महाराष्ट्राच्या नंदुरबार विधानसभा (Nandurbar) मतदारसंघातून निवडून गेलेले तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेतील आमदार आहेत. ते महाराष्ट्र सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि फलोत्पादन या खात्यांचे ते कॅबिनेट मंत्री होते. डॉ. विजयकुमार गावित यांचा जन्म नंदुरबार जिल्ह्यातील नटावद या  गावी 22 जुलै 1955 साली झाला. वडील शिक्षकी पेशात होते. वडिलांनी जनता दलाच्या तिकिटावर निवडून येत काँग्रेसला पराभव केले होते. विजयकुमार गावित हे भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे चर्चेत होते.  राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या आणि भाजपच्या तिकिटावर नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेल्या डॉ. विजयकुमार गावित यांना भ्रष्टाचार प्रकरणावरून अनेकदा टार्गेट करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एम.जी.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने विजयकुमार गावित यांना आदिवासी कल्याण विभागातील भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरवले होते.

आदिवासी कल्याण विभागांतर्गत मंडळाचे पदसिद्ध प्रमुख असताना टेंडरशिवाय कोट्यवधी रुपयांची कामे वाटप केल्याचा आरोप त्यांच्यावर सिद्ध झाला होता. गावित यांचे हे कारनामे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जुन्या सरकारमध्ये त्या खात्याचे मंत्री असतानाचे आहेत. त्यांनी पक्षांतर केले आणि भाजपमध्ये प्रवेश केला. आज ते भाजपचे आमदार आहेत. त्यांची मुलगी हिना गावित नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या खासदार आहेत.

विशेष म्हणजे त्यांच्याविरोधातील चौकशी समितीचा अहवाल जानेवारी 2017 मध्ये महाराष्ट्र सरकारला सादर करण्यात आला होता, त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. चौकशी आयोगाचा अहवाल सरकार सार्वजनिक का करत नाही, असा सवाल करत काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यांच्यावर तारेषे ओढले होते. भाजप कार्यकर्त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत सरकारने निकष दुप्पट केला का, असा सवाल पाटील यांनी केला होता.

हे सुद्धा वाचा

गावित कुटुंबीय राजकारणात सक्रिय

डॉ. विजयकुमार गावित यांच्यानंतर त्यांचे कुटूंबीय देखील राजकारणात सक्रिय असून त्यांची मुलगी डॉ. हिना गावित या खासदार आहेत. दुसरी कन्या सुप्रिया या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. त्यांची पत्नी कुमुदिनी गाविता या जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य असून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आहेत. त्यांचे बंधू शरद गावित हे माजी आमदार असून शरद गावित यांचा मुलगा प्रकाश गावित हा देखील उमेदवार होता.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.