सत्तेसाठी हापापलेल्यांनी नालायकपणा दाखविला…गुलाबराव पाटील यांच्यावर विजय वडेट्टीवार यांची जहरी टीका, आणखी म्हणाले वडेट्टीवार ?

कसबा आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजप वाटेल ते करू शकत असं म्हणत कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

सत्तेसाठी हापापलेल्यांनी नालायकपणा दाखविला...गुलाबराव पाटील यांच्यावर विजय वडेट्टीवार यांची जहरी टीका, आणखी म्हणाले वडेट्टीवार ?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 5:07 PM

प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी, रायपुर : कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार ( Vijay Vadettivar ) यांनी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत जर भाजप हरले तर एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) आणि देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) ही जोडी शिल्लक राहणार नाही असं मोठं विधान केले आहे. तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या मराठा मुख्यमंत्री विधानावरुन विजय वडेट्टीवर यांनी गंभीर टीका केली आहे. सत्तेसाठी हपापलेल्यांनी स्वार्थीपणा आणि नालायकपणा दाखवला आहे असल्याची जहरी टीकाच विजय वडेट्टीवर यांनी केली आहे. जनता आमच्या बाजूला आहे असं म्हणत चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होईल असं म्हंटलं आहे.

कसबा आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजप वाटेल ते करू शकत असं म्हणत कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. याशिवाय या दोनही निवडणूका हरल्या तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे जोडी शिल्लक राहणार नाही असं म्हंटलं आहे.

दिल्लीतील आका यांचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काही करा पण निवडणूका जिंका असं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठरविले असल्याचा अंदाज विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

जनता आमच्या बाजूला आहे, सुरुवात विदर्भात झाली आहे. भाजपला विदर्भातून साफ करण्याचं काम सुरू केलंय पश्चिम महाराष्ट्रातही होईल असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

गुलाबराव पाटील यांनी मराठा मुख्यमंत्री होण्यासाठी मी गद्दारी केली मी काय येडा होतो का ? असं म्हणत मोठं विधान केलं आहे. त्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले कोणत्या विचारानं माणूस होतो कोणाच्या भरवशानं मोठा होतो याला महत्व असतं. कोणत्या जातीचा कोण मोठा होता याला महत्त्व नसतं.

माणूस मोठा होत असतांना त्याची त्यावेळी जात दिसत नाही. सत्तेसाठी हपापलेल्यांनी स्वार्थीपणा आणि नालायकपणा दाखवला आहे अशी टीका ही विजय वडेट्टीवार यांनी गुलाबराव पाटील यांच्या मराठा मुख्यमंत्री विधानावरून केली आहे.

विजय वडेट्टीवारा यांनी देवेंद्र फडणवीस आणि गुलाबराव पाटलांवर टिका करत आम्ही विधानपरिषदेच्या निवडणूकीत देवेंद्र फडणवीसांच्या गडात विजय मिळवला आहे. काँग्रेसमध्ये एकी नाही असं म्हणतात मग विजय मिळाला असता का ?जिंकण्यासाठी भाजपा वाटेल त्या स्तराला जातीये अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.