विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेतेपदी, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते दोघेही विदर्भाचे!

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची अखेर विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी  वर्णी लागली आहे.विरोधीपक्षाने  विजय वडेट्टीवार यांचं नाव एकमताने विरोधी पक्षनेतेपदी सुचवलं होतं.

विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेतेपदी, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते दोघेही विदर्भाचे!
Follow us
| Updated on: Jun 24, 2019 | 4:26 PM

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची अखेर विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी  वर्णी लागली आहे.विरोधीपक्षाने  विजय वडेट्टीवार यांचं नाव एकमताने विरोधी पक्षनेतेपदी सुचवलं होतं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद हवे असेल, तर काँग्रेसने विधान परिषदेचे उपसभापती पद आम्हाला द्यावे, अशी मागणी भाजप-शिवसेनेने केली होती. युतीच्या या खेळीत यश आल्याने काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळालं. राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजपकडून मंत्रिमंडळात समावेश केल्याने, विरोधी पक्षनेतेपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर आज विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा झाली.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेल्या विजय वडेट्टीवार यांची ओळख सभागृहाला करुन दिली. वडेट्टीवार यांना टोमणे मारत मुख्यमंत्र्यांनी ओळख करुन दिली.

“वडेट्टीवार हे अनेकवर्षे  या सभागृहाचे ते सदस्य आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळातही त्यांना संधी मिळाली होती. निवडणुकीच्या तोंडावरच त्यांना काँग्रेसकडून संधी दिली जाते. मात्र निवडणूक संपल्यानंतर त्यांना बाजूला करुन दुसऱ्याला संधी दिली जाते. मात्र मला विश्वास आहे की आता विरोधी पक्षनेतेपद तुमच्याकडेच राहणार आहे. त्यामुळे काँग्रेसने यापुढेही वडेट्टीवारांना संधी द्यावी” असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता दोन्ही विदर्भाचे

दरम्यान, विधानसभा नेतेपदी काँग्रसेने विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हापूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांना संधी दिली आहे. विजय वडेट्टीवर हेच विरोधी पक्षनेते असतील, हे निश्चित मानले जात होतं. आता त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झालं. राज्य सरकारच्या उरलेल्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने मुख्यमंत्रीही विदर्भातील आणि विजय वडेट्टीवार यांच्या रुपाने विरोधी पक्षनेताही विदर्भातील आहे. हा अनोखा योगायोग म्हणावा लागेल.

कोण आहेत विजय वडेट्टीवार?

  • विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे चंद्रपुरातील ब्रम्हपूरचे आमदार आहेत.
  • काँग्रेसचे विधानसभेतील ओबीसी समितीचे ते सदस्य आहेत
  • विजय वडेट्टीवार यांनी 80 च्या दशकात एनएसयूआयमधून राजकीय करिअरला सुरुवात केली
  • 1991 ते 93 दरम्यान ते गडचिरोली जिल्हा परिषदेचे सदस्य होते.
  • 1998 ते 2004 यादरम्यान त्यांनी विधानपरिषदेची आमदारकी भूषवली.
  • 2004 मध्ये ते चंद्रपुरातील चिमूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले.
  • 2008 -09 मध्ये त्यांनी जलसंपदा राज्यमंत्रीपद भूषवल. शिवाय ते आदिवासी विकास, पर्यावरण आणि वन राज्यमंत्रीही होते.
  • 2009-10 मध्ये ते पुन्हा चिमूरमधून निवडून आले.
  • 2010 – मध्ये अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांना पुन्हा विविध खात्याचं राज्यमंत्रीपद मिळालं.
  • 2014 मध्ये  ते पुन्हा ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आले.
  • 24 जून 2019 रोजी त्यांची निवड महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपीद झाली.

संबंधित बातम्या  

विरोधी पक्षनेतेपद हवे तर उपसभापतीपद द्या, सत्ताधाऱ्यांकडून काँग्रेसची कोंडी 

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी बाळासाहेब थोरात आघाडीवर 

बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...