Vinayak Raut : आधी परवानगी दिली नंतर पलटी खाल्ली; नीच राजकारण सुरूये, दसरा मेळाव्यावरून राऊतांचा टोला

Vinayak Raut सध्या विस्मृतीचं राजकारण सुरू आहे, दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेकडून केव्हाच पत्र पाठवण्यात आलं आहे.  आधी परवानगी दिली आणि नंतर आता ते बदलले असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

Vinayak Raut : आधी परवानगी दिली नंतर पलटी खाल्ली; नीच राजकारण सुरूये, दसरा मेळाव्यावरून राऊतांचा टोला
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 2:09 PM

मुंबई : यंदा शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा होणार का?  दसरा मेळावा झालाच तर तो कोणाचा होणार, शिंदे गट की उद्धव ठाकरे असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.  यंदा दसरा मेळाव्यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आमने-सामने येण्याची शक्यता आहे.  त्यावरून आता राजकारण तापण्यास सुरुवात झालीये.  यावर शिवसेना (Shiv Sena) नेते विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया देताना शिंदे गट आणि भाजपाला (BJP) टोला लगावला आहे. सध्या विस्मृतीचं राजकारण सुरू आहे, दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेकडून केव्हाच पत्र पाठवण्यात आलं आहे.  आधी परवानगी दिली आणि नंतर आता ते बदलले,अडचणी सांगण्यास सुरुवात केली असं राऊत यांनी  म्हटलं आहे. तर दुसरीकडे जे नियमात आहे तेच होईल, सरकार नियमाबाहेर जाऊन कोणतेही काम करत नसल्याची प्रतिक्रिया यावर बोलताना फडणवीसांनी दिली आहे.

नेमकं काय म्हटलं राऊतांनी?

शिवाजी पार्कमध्ये यंदा दसरा मेळावा होणार का? झाल्यास कोणाचा होणार यावर बोलताना विनायक राऊत यांनी शिंदे गटाला जोरदार टोला  लगावला आहे. सध्या विस्मृतीचं राजकारण सुरू झालं आहे. शिवसेना दरवर्षी शिवाजी पार्कमध्ये मेळावा घेत असते. गेल्या अनेक वर्षांपासून ही पंरपरा चालू आहे. यंदा देखील दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी केव्हाच पत्र पाठवण्यात आले आहे. त्यांनी आधी परवानगी दिली, मात्र आता पलटी खाल्ली आहे.  राजकारणाची हद्द पार झालीये, नीच राजकारण सुरू असल्याचे विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

‘गणेश मंडळांवर शिंदे गटाची उधळपट्टी ‘

यावेळी बोलताना राऊत यांनी शिंदे गटाकडून गणेश मंडळांवर उधळपट्टी सुरू असल्याचं  म्हटलं आहे. त्यांनी खोके कमावले आहेत, मग आता खर्च तर होणारच. खर्च करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. यंदा फक्त मंडळांकडूनच उधळपट्टी होईल असं वाटत नाही. मात्र त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी निवडणूक कधीही झाली तर जनतेचा कौल हा उद्धव ठाकरेंनाच मिळेल असं राऊत यांनी म्हटलं आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.