Vinayak Mete: विनायक मेटे यांच्या बॉडीगार्डला पुण्याच्या रुबी हॉस्पिटलला हलवलं, मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस

Vinayak Mete: विनायक मेटेंवर आज दुपारी तीन वाजता राजेगाव या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Vinayak Mete: विनायक मेटे यांच्या बॉडीगार्डला पुण्याच्या रुबी हॉस्पिटलला हलवलं, मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस
Eknath Shinde
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 2:49 PM

पुणे : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. त्यात त्यांचं निधन झालं. या अपघातामध्ये विनायक मेटेंसोबतच वाहनचालक आणि बॉडीगार्ड ही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार कामोठेतील एमजीएम रुग्णालयात सुरू होते. मात्र बॉडीगार्ड राम ढोबळे (Ram Dhobale) यांना त्यांच्या कुटुंबियांनी पुण्यातील रुबी रुग्णालयात हलवले आहे. रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्यांना एमजीएम रुग्णालयामधून कार्डिओ ॲम्बुलन्सच्या माध्यमातून त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात हलवण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी या रुग्णाच्या कुटुंबियांशी फोनवरून संपर्क साधत जखमी अंगरक्षकाची विचारपूस केली. आपल्या वैद्यकीय टीमला हॉस्पिटलमध्ये पाठवून त्यांची पुण्याला पाठवायची व्यवस्था केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा संपूर्ण खर्च करणार असल्याचेही सांगितले. त्याच्या खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घरच्यांना फोन केल्यामुळे जखमींच्या कुटुंबियांनी त्यांचे आभार मानलेत.

कोन आहे राम ढोबळे?

बीड जिल्ह्यातील चीचवली माळी गावात राहणाऱ्या राम ढोबळे यांची 2007 साली पोलीसात नियुक्ती झाली. त्यांचे मोठे बंधूचे चार वर्षांपूर्वी निधन झाल्याने घरची जबाबदारी राम स्वतः पार पाडतात. राम हे आई-वडील पत्नी आणि दोन मुलासोबत राहतात. सहा ते सात महिन्यापूर्वी त्यांची नियुक्ती शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे याचे अंगरक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. अपघाताच्या दिवशी तेही त्याच गाडीत असल्याने या अपघातात तेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्यावर पोटात पायाला आणि शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाले आहेत. त्यांच्यावर रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

मेटेंवर आज अंत्यसंस्कार

विनायक मेटे  यांचं निधन झालंय. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर त्यांच्या त्यांच्या गाडीला अपघात झाला. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल त्यांचं पार्थिव मुंबईतील वडाळ्यातील त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर दुपारी ते बीडच्या दिशेने रवाना झालं. त्यांचं पार्थिव बीडमधील केज तालुक्यातील राजेगाव या त्यांच्या मूळगावी दाखल झालं आहे. गावातील लोक, त्यांचे समर्थक कार्यकर्ते यांना अंत्यदर्शन घेता यावं यासाठी त्यांचं पार्थिव शिवसंग्राम भवनात आणि त्यांच्या घरात ठेवण्यात येणार आहे. विनायक मेटेंवर आज दुपारी तीन वाजता राजेगाव या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.