कौरव कोण?, पांडव कोण? याचं मूल्यमापन फडणवीस, पाटीलच करतील; मेटेंचं सूचक विधान

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भाषणावर भाजमधून पडसाद उमटत असतानाच भाजपच्या मित्र पक्षांनीही त्यावर भाष्य करायला सुरुवात केली आहे. (vinayak mete)

कौरव कोण?, पांडव कोण? याचं मूल्यमापन फडणवीस, पाटीलच करतील; मेटेंचं सूचक विधान
विनायक मेटे, अध्यक्ष, शिवसंग्राम संघटना
Follow us
| Updated on: Jul 14, 2021 | 2:38 PM

मुंबई: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भाषणावर भाजमधून पडसाद उमटत असतानाच भाजपच्या मित्र पक्षांनीही त्यावर भाष्य करायला सुरुवात केली आहे. शिवसंग्रामचे नेते, आमदार विनायक मेटे यांनीही पंकजा यांच्या भाषणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कौरव कोण आणि पांडव कोण याचं मूल्यमापन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील करतील, असं सूचक विधान विनायक मेटे यांनी केलं आहे. (vinayak mete reaction on pankaja munde’s yesterday speech)

विनायक मेटे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे आणि भाजपमधील संघर्षावर भाष्य केलं. पंकजा मुंडे यांनी काय विचार करायचा, काय नाही करायचा हा त्यांचा प्रश्न आहे. असे अनेक प्रसंग पंकजा मुंडे आणि भाजपमध्ये निर्माण झाले आहेत. त्यांनी कौरव किंवा पांडव असं भाष्य केलं. त्याचं योग्य मूल्यमापन भाजप, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील करतील, असं मेटे म्हणाले. भाजपच्या नेत्यांची त्यावर काय भूमिका ही त्यांनाच माहीत. पंकजाताईंनी ही भूमिका का घेतली हे त्याच सांगतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी आणि भाजप नेते अमित शहा हे समर्थ आहेत, कुणाला काय द्यायचं हे ते सांगतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेसमध्ये खदखद

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. काँग्रेसच्या मनात खदखद आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटतंय की या सरकारमध्ये ते भरडले जात आहेत. काँग्रेसला सत्तेत लाभ नाहीये, पक्षाला कार्यकर्त्यांना सत्तेचा लाभ मिळत नाही. नाना पटोलेंना राज्यातून या तक्रारी ऐकायला मिळत आहेत. त्यामुळेच त्यांनी वस्तुस्थिती मांडलीय. काँग्रेसची कोंडी होतेय, असं त्यांनी सांगितलं.

नानांचा दोन्ही पक्षांना त्रास

राष्ट्रवादी आणि शिवसेना काँग्रेसच्या वाट्याला काहीच देत नाही. त्यामुळेच काँग्रेसने नानांची पक्षाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ते त्यांचं काम करत आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांना त्रास होत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष हुशार आहेत. हे दोन्ही पक्ष काँग्रेसच्या काही नेत्यांना हाताशी धरून नानांची कोंडी करू पाहत आहेत, असा दावाही त्यांनी केला.

खडसे सत्याचा सामना करतील

यावेळी त्यांनी झोटिंग समितीच्या अहवालावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मंत्रालयात अनेक अहवाल पडून असतात. झोटींग समितीचा अहवाल गहाळ होईल असं वाटत नाही,. हे जाणीवपूर्वक झालं असेल असंही वाटत नाही. हा प्रशासनातील दोष आहे, असं सांगतानाच खडसेंनी नेहमीच सत्याचा सामना केला आहे. यावेळीही करतील, असं त्यांनी सांगितलं.

शिवस्मारकाबाबत उद्या बैठक

शिवस्मारकाचा मुद्दा महत्वाचा आहे. शिवस्मारकाच्या ऑफिसची दुरावस्था झाली आहे. प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. कोर्टाने तोंडी स्थगिती दिली आहे. पण ऑफिसची पडझड झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय, असं मेटे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या संध्याकाळी 5 वाजता बैठक बोलावली आहे. त्यात काही तरी ठोस निर्णय होईल अशी आशा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

15 मागण्यांवर उद्या बैठक

मराठा आरक्षणाबद्दल मुख्यमंत्र्यांच्या आसपासच्या लोकांनीच त्यांना चुकीची माहीती दिली आहे. समाजाचा मनात सरकारविरोधात रोष आहे. सरकारच्या नाकर्तेपणाने आरक्षण टिकलं नाही. आता ज्या इतर मागण्या आहे, त्यांच्यासाठीही उद्या 4 वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. एक तास ही बैठक चालेल. या बैठकीत 15 मागण्या करण्यात आल्या आहे. त्या पूर्ण केल्या पाहिजेत. म्हणजे आमचाही मार्ग मोकळा होईल, असं आवाहन त्यांनी केलं. (vinayak mete reaction on pankaja munde’s yesterday speech)

संबंधित बातम्या:

काँग्रेससोबत 2014 मध्ये धोका, मला कालच्या भेटीचं निमंत्रणच नव्हतं, नानांचं पवारांकडे बोट?

VIDEO: फडणवीस सरकारचे चिठ्ठे बाहेर आले तर फडणवीसही अडचणीत येतील; नाना पटोलेंचा मोठा गौप्यस्फोट

पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाही: चंद्रकांत पाटील

(vinayak mete reaction on pankaja munde’s yesterday speech)

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.