Vinayak Raut Video : एकाच्यात नादायचं, दुसऱ्याचं मंगळसूत्र, तिसऱ्याचा संसार, गर्भ चौथ्याचा, ही गद्दाराची व्याख्या, बंडखोरांवर विनायक राऊतांचा हल्लाबोल

गद्दारांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा नाही. शिंदे गटाचे बागडे 40 गेले तर 100 कमावले, शिवसेनेचा भगवा शिलेदार निवडून येणार, असा नारा आज विनायक राऊत यांनी दिलेला आहे. 

Vinayak Raut Video : एकाच्यात नादायचं, दुसऱ्याचं मंगळसूत्र, तिसऱ्याचा संसार, गर्भ चौथ्याचा, ही गद्दाराची व्याख्या, बंडखोरांवर विनायक राऊतांचा हल्लाबोल
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 8:34 PM

रत्नागिरी : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बंड झाल्यापासून आणि राज्यात नवं सरकार आल्यापासून शिवसेनेचे दोन राऊत रोज या बंडखोर आमदारांवरती हल्लाबोल चढवत आहेत. त्यात संजय राऊत (Sanjay Raut) आणि विनायक राऊत (Vinayak Raut) हे सर्वात जास्त आघाडीवर आहेत. सर्व आमदारांच्या टार्गेटवर असलेले संजय राऊत काल नाशिक मध्ये पुन्हा आक्रमक मूडमध्ये दिसून आले. तर आज विनायक राऊत त्याहून ही अधिक आक्रमक मोडमध्ये दिसून आले. त्यांनी आमदारांवर अत्यंत तीक्ष्ण शब्दात हल्लाबोल चढवला आहे. भगवे तेज पाहून बंडकरांची मतदार संघात पाय ठेवायची हिम्मत होणार नाही. गद्दारांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा नाही. शिंदे गटाचे बागडे 40 गेले तर 100 कमावले, शिवसेनेचा भगवा शिलेदार निवडून येणार, असा नारा आज विनायक राऊत यांनी दिलेला आहे.

एकाशी लग्न, दुसऱ्यांचं मंगळसूत्र..

तसेच उदय सामंत आणि दीपक केसरकर यांच्यावरही जोरदार हल्लाबोल चढवला आहे. रत्नागिरीचा उपरा आणि सिंधुदुर्गातील तो बाडगा, दोन्ही शिवसेनेचे बाडगा आणि कोडगा यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली. आणि बेशरमपणे सांगता येत आम्ही शिवसेनेचे दुसऱ्यांचे बाप शोधणारे भाजपशील लोटांगण घातलं. अशा शब्दात त्यांनी सामंत आणि केसरकर यांच्यावर टीका केली आहे. तर उदय सामंत यांना काल परवा शिवसेनेत आला आणि म्हणतायेत मला शिवसेना वाचवायची आहे, असे नाव न घेता सामंत यांच्यावर टीका केली आहे. रत्नागिरीत मला असं कार्ट जन्माला यावे, याची लाज वाटते असेही, यावेळी राऊत म्हणाले आहेत. तर गद्दाराची व्याख्या म्हणजे, एकाच्या घरी नांदायचं, दुसऱ्याच्या घरी मंगळसूत्र घालायचं, तिसऱ्याच्या घरी संसार करायचा, आणि चौथ्या चा गर्भ वाढवायचा, अशी घनाघाती टीका विनायक राऊत यांच्याकडून बंडखोर आमदारांवर करण्यात आली.

खाल्लेल्या अन्नाला विसरलात

तसेच उद्धव ठाकरे यांनी या आमदारांना खूप जवळ केलं मातोश्रीवरचा अन्न देखील तुम्हाला रश्मी वहिनींनी खायला घातलं  तुम्ही अन्नाची किंमत का ठेवली नाही? असा सवाल त्यांनी केलाय. तर 5000 कोटींच्या बॅगा भरायच्या आणि महाराष्ट्रात यायचं प्रत्येकाचा खोका 50 खोक्याचा, तुम्ही विका आणि खानदान विका, मात्र आईलाही विकायला निघालात. मात्र चाळीसच्या जागी आम्ही शंभर उभे करू, शिवसेनाला नष्ट करणाऱ्या भाजपला तुम्ही साथ देत आहे, मात्र आम्हाला अभिमान आहे, औरंगाबादचं नाव संभाजीनगर केले, उस्मानाबादचं नाव धाराशिव केलं, असेही ते म्हणाले आहेत, तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करता निधी नाही दिला, असे म्हणत त्यांनी निधीवरूनही आमदारांचा समाचार घेतला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.