राणेंनी उद्धव ठाकरेंना एकदा नाही, तीनदा फोन केला, राऊतांचा दावा

मुख्यमंत्र्यांनी तातडीने मंजुरी देण्याचं काम केलं. जो प्रस्ताव रखडला होता तो राणेंच्या कंगालपणामुळे, असा निशाणाही विनायक राऊत यांनी साधला. (Vinayak Raut Narayan Rane Uddhav Thackeray)

राणेंनी उद्धव ठाकरेंना एकदा नाही, तीनदा फोन केला, राऊतांचा दावा
भाजप नेते नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 10:30 AM

सिंधुदुर्ग : खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी एकदा नव्हे, तर तीन वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना फोन केला होता. तीन-तीन वेळा फोन केला म्हणून मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून राणेंची विचारपूस केली आणि काय काम आहे ते विचारुन घेतलं. नारायण राणे गृहमंत्री अमित शाहांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिव्या द्यायचं काम करतात, राणेंचा तो परीपाट आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी घणाघाती टीका केली. (Vinayak Raut claims Narayan Rane called CM Uddhav Thackeray thrice)

“राणेंच्या हॉस्पिटलला शिवसेनेने कदापिही खो घालण्याचा प्रयत्न केला नाही, उलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जेव्हा फाईल आली, तेव्हा तातडीने मंजुरी देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. जो प्रस्ताव रखडला होता तो राणेंच्या कंगालपणामुळे” असा निशाणाही विनायक राऊत यांनी साधला.

“शाहांसाठी खोली, देशासाठी दैवताचं मंदिर”

“केवळ भाजपच्या विश्वासघातकीपणामुळे शिवसेनेला दूर जावं लागलं. अमित शाह ज्या बंद खोलीत चर्चा झाली म्हणतात, ती त्यांच्या दृष्टीने खोली असेल, मात्र शिवसेना आणि संपूर्ण देशासाठी एका दैवताचं मंदिर आहे. त्याच मंदिरातील दैवताने अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी एवढा मोठा आशिर्वाद ठेवला होता, म्हणून देशाला आज नरेंद्र मोदी आणि अमित शाह दिसत आहेत” असा टोला विनायक राऊतांनी लगावला.

“केंद्रीय गृहमंत्री अमित शाह खोटारडे आणि विश्वासघातकी आहेत. शाहांच्या हटवादीपणामुळे सतरा ते अठरा पक्ष एनडीएतून बाहेर पडले. भाजप आणि आणखी एक पक्ष सोडला, तर सर्वच पक्ष भाजपपासून दुरावले आहेत. त्यामुळे विश्वासघातकी नेमकं कोण, हे आता दिसून येत आहे” अशा शब्दात विनायक राऊत यांनी शाहांच्या टीकेला उत्तर दिलं.

“शाह-राणेंची युती लाईफ टाईम टिको”

“नारायण राणे आणि अमित शाह यांच्यासारख्या समविचारी लोकांची युती झाली असेल. ही युती लाईफटाईम टिको अशी अपेक्षा आहे. भाजपकडून खोटारडेपणाचं राजकारण सुरु आहे. केंद्रात जी सत्ता आली आहे ती निष्ठूरपणे राबवायची हा त्यांचा एकमेव धंदा आहे. जो विरोधात गेला त्याच्या पाठी ईडी लावायची” अशी टीकाही राऊतांनी केली. (Vinayak Raut claims Narayan Rane called CM Uddhav Thackeray thrice)

“फडणवीसांचे लाड पुरवण्यासाठी वारंवार खोटं”

“खोटं बोल पण रेटून बोल याच कारणामुळे संपूर्ण एनडीए, जो अटलबिहारी वाजपेयी यांनी स्थापन केला, तो आज यांच्या खोटारडेपणामुळे विखुरला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे लाड पुरवण्यासाठी तुम्ही वारंवार खोटं बोलत होता. मात्र भाजपमधील अनेक लोकांना आजही वाटते की त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी घोडचूक केली. स्वतःच्या फायद्यासाठी युतीचा फायदा करुन घेतला. केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टापायी युती तुटली, हे आता दिल्लीतील भाजपचे नेते मान्य करत आहेत” असा दावा विनायक राऊतांनी केला.

संबंधित बातम्या :

सिंधुदुर्गातील मेडिकल कॉलेजसंदर्भातील परवानग्यांसाठी भाजप नेते नारायण राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन

नारायण राणेंना केंद्रात बढती मिळणार?; अमित शाहांच्या कोकण दौऱ्यामुळे जोरदार चर्चा

(Vinayak Raut claims Narayan Rane called CM Uddhav Thackeray thrice)

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.