अनुभवामुळे पक्षाकडून जबाबदारी, भाजप हरियाणाच्या प्रभारीपदी निवडीनंतर तावडेंची प्रतिक्रिया

माझा कमबॅक म्हणण्यापेक्षा पक्षाने माझा अनुभव पाहून माझ्यावर जबाबदारी दिली, असं विनोद तावडे म्हणाले

अनुभवामुळे पक्षाकडून जबाबदारी, भाजप हरियाणाच्या प्रभारीपदी निवडीनंतर तावडेंची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 3:26 PM

मुंबई : भाजप नेते आणि माजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्याकडे भाजपने हरियाणाचे प्रभारीपद सोपवले आहे. माझा अनुभव पाहून पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली असावी, असं मत विनोद तावडेंनी व्यक्त केलं. (Vinod Tawde reaction after elected as Haryana BJP Incharge)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीच्यानिमित्ताने राष्ट्रीय राजकारणात आपली छाप पाडल्यानंतर भाजपकडून महाराष्ट्रातील आणखी काही नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपकडून नुकतीच राज्यनिहाय प्रभारींची नवी यादी जाहीर करण्यात आली.

“भाजपचे हरियाणाचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली गेली आहे. माझा कमबॅक म्हणण्यापेक्षा पक्षाने माझा अनुभव पाहून माझ्यावर जबाबदारी दिली, असं वाटतं. हरियाणामध्ये जाट जातीचं वर्चस्व आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष ओपी धनकर यांच्याशी संवादातून पक्षाचे मजबूतीकरण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, अशी प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.

विनोद तावडे यांनाही गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आले होते. त्यामुळे ते पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात असे. काही दिवसांपूर्वी भाजपकडून विनोद तावडेंना राष्ट्रीय कार्यकारिणीत सामावून घेण्यात आले होते. तेव्हाच विनोद तावडे यांना भविष्यात राष्ट्रीय राजकारणात सक्रिय करणार असल्याचे संकेत मिळाले होते.

विनोद तावडेंचा राजकीय प्रवास

अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेला, संघाच्या मुशीत घडलेला एक नेता. अत्यंत महत्त्वाकांक्षी, तेवढाच बुद्धिमान आणि धूर्त नेता म्हणून विनोद तावडे यांची ओळख आहे.

विनोद तावडे यांनी 1985 पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. यानंतर विनोद तावडे यांनी एकएक पायरी चढत महाराष्ट्र भाजपमधील प्रमुख नेत्यांच्या पंक्तीत स्थान मिळवले. (Vinod Tawde reaction after elected as Haryana BJP Incharge)

नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे या दोन बड्या नेत्यांच्या सावलीत राहून विनोद तावडे यांनी भाजपमध्ये स्वत:चे भक्कम स्थान निर्माण केले. 1995 मध्ये राज्यात युतीचे सरकार आले तेव्हा भाजपच्या वर्तुळात विनोद तावडे यांच्याभोवती प्रचंड वलय होते. मात्र, 2014 पासून विनोद तावडे यांच्याभोवतीचे हे वलय हळूहळू फिकट व्हायला सुरुवात झाली. शिक्षणमंत्री म्हणून त्यांचे अनेक निर्णय आणि वक्तव्ये वादग्रस्त ठरली. इथून त्यांच्या पडझडीचा काळ सुरू झाला.

2014 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना उत्तर मुंबईतला बोरिवली मतदारसंघ तयार मिळाला होता. तिथे गोपाळ शेट्टींसारखे खासदार असल्यामुळे तावडे सहजपणे निवडून आले. पण निवडून आल्यावर तावडे पाच वर्ष मतदारसंघात फिरकलेही नसल्याची ओरड झाली. 2019 मध्ये भाजपाकडून निवडणूकपूर्व सर्वेक्षण झालं त्यांच्या विरोधात गेल्याने तावडेंचं तिकीट कापल्याची चर्चा आहे.

कोणाला कुठली जबाबदारी?

मराठवाड्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मध्य प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर त्रिपुरात डाव्यांची सत्ता उलथवून भाजपचे कमळ फुलवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या सुनील देवधर यांची आंध्र प्रदेशचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

विनोद तावडेंची सेकंड इनिंग; राष्ट्रीय राजकारणात छाप पाडणार?

(Vinod Tawde reaction after elected as Haryana BJP Incharge)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.