पैगंबराच्या वादग्रस्त विधानावरुन दुसऱ्या दिवशीही हिंसाचार सुरुच, हावडा येथे आजही दगडफेक, रांचीत कालच्या दंगलीत दोन ठार, उ. प्रदेशात कडेकोट बंदोबस्त

विशेषबाब म्हणजे आतापर्यंतच्या तपासात असेही समोर आले आहे की, जमावासमोरून चालणारे बहुतांश तरुण हे 16 ते 25 वयोगटातील होते. हे लोक काही स्थानिक नेत्यांच्या प्रभावाखाली मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आले होते.

पैगंबराच्या वादग्रस्त विधानावरुन दुसऱ्या दिवशीही हिंसाचार सुरुच, हावडा येथे आजही दगडफेक, रांचीत कालच्या दंगलीत दोन ठार, उ. प्रदेशात कडेकोट बंदोबस्त
हिंसाचारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 6:51 PM

नवी दिल्ली : भाजप नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) वादग्रस्त विधानंतर देशातील उत्तर प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांमध्ये शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर हिंसाचार (Violence) उसळला. या तीनही राज्यांमध्ये लोक रस्त्यावर उतरले आणि अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. उत्तर प्रदेशातील 8 शहरांमध्ये प्रयागराज, मुरादाबाद, सहारनपूर, फिरोजाबाद, आंबेडकर नगर, हाथरस, अलीगढ, जालौनमध्ये लोकांनी जोरदार आंदोलने केली . याआंदोलनांना येथे हिंसक वळन लागले. यादरम्यान पश्चिम बंगालच्या (West Bengal) हावडा जिल्ह्यात शेकडो आंदोलकांनी रस्ते रोखून निषेध केला. तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड करून हल्लेखोरांनी त्याला आगही लावली. तर बंगालमधील हावडा येथे सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारीही जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. दरम्यान हावडामधील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेता पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षक (एसपी) बदलण्यात आले आहेत.

झारखंड: हिंसाचारात 2 ठार, 13 जखमी

रांचीच्या मेन रोडवर शुक्रवारच्या नमाजानंतर हिंसाचार उसळला. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. अराजक घटकांच्या बाजूने दगडफेक करण्यात आली. तोडफोड करण्यात आली. जाळपोळ झाली. यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. तर 25 जण जखमी झाले आहेत. हिंसाचारानंतर रांचीमध्ये कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बाधित क्षेत्र सील करण्यात आले असून सरकारने कोणालाही घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. तर सध्या इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. तर विशेषबाब म्हणजे आतापर्यंतच्या तपासात असेही समोर आले आहे की, जमावासमोरून चालणारे बहुतांश तरुण हे 16 ते 25 वयोगटातील होते. हे लोक काही स्थानिक नेत्यांच्या प्रभावाखाली मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आले होते.

दरम्यान मेन रोडच्या महावीर मंदिरावर दगडफेक करताना काही तरुण दिसत आहेत. मंदिराजवळ एक तरुण इस्लाम जिंदाबादचा नारा देत आहे. त्याचवेळी तेथे गोळी चालली जी थेट तरुणाच्या डोक्याला लागली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. तर शुक्रवारच्या हिंसाचारात आतापर्यंत दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. मुदस्सर (22) आणि शाहील (24) अशी मृतांची नावे आहेत. तर 25 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. यामध्ये सुमारे 12 जण RIMS मध्ये दाखल आहेत. त्याचवेळी सदर रुग्णालयात 10-12 जणांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून, जखमी झालेल्या रांचीचे एसएसपी उपचार घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

प. बंगाल : सलग दुसऱ्या दिवशी हिंसाचार सुरूच

शुक्रवारी सुरू झालेली दंगल शनिवारीही सुरूच होती. हावडा येथील पंचला बाजारात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. परिस्थिती पाहता, हावडा येथील उलुबेरिया उपविभागांतर्गत राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे स्थानकांभोवती 15 जूनपर्यंत कलम 144 लागू करण्यात आली आहे. तर शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड करून हल्लेखोरांनी त्याला आगही लावली होती.

दरम्यान, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या हिंसाचारावरून पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भाजपचे पाप जनतेने का भोगावे? ममताने सोशल मीडियावर लिहिले – हावडा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी हिंसाचार होत आहे. यामागे काही राजकीय पक्ष आहेत, ज्यांना दंगल घडवायची आहे, पण ती खपवून घेतली जाणार नाही. असे करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच हावडा येथील हिंसाचारग्रस्त भागात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या बंगाल भाजप अध्यक्षा सुकांता मजुमदार यांना पोलिसांनी अटक केली आहे.

उत्तर प्रदेश : सुरक्षा व्यवस्था फोल

कानपूरमध्ये 3 जून रोजी झालेल्या हिंसाचारानंतर अवघ्या 7 दिवसांनी यूपीच्या 8 जिल्ह्यांमध्ये गोंधळ झाला. शुक्रवारच्या नमाजानंतर जमाव रस्त्यावर उतरला. भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे नमाजी संतापले होते. प्रयागराज, मुरादाबाद, सहारनपूर, फिरोजाबाद, आंबेडकर नगर, हाथरस, अलिगढ, जालौनमध्ये उपासक रस्त्यावर उतरले. दोन दिवस पोलीस-प्रशासन सतर्क होते, मात्र अखेरच्या क्षणी सर्व सुरक्षा व्यवस्थेची तयारी फोल ठरली.

तर सर्वाधिक हिंसाचार हा प्रयागराजमध्ये झाला. येथे निमलष्करी दलाचे अनेक जवान जखमी झाले. तसेच देवबंदमध्ये अल्लाह-हू-अकबरच्या घोषणा देण्यात आल्या. मात्र, कानपूरमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने सर्व काही नियंत्रणात राहिले. शनिवारी दुपारपर्यंत सहारनपूरमध्ये 48, प्रयागराजमध्ये 68, हाथरसमध्ये 50, मुरादाबादमध्ये 25, फिरोजाबादमध्ये 8, आंबेडकरनगरमध्ये 28 जणांना अटक करण्यात आली आहे. एकूण 227 ताब्यात घेण्यात आले आहे.

सहारनपूर हिंसाचारामागे काळे कपडे-निळी टोपीवाले

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या हिंसाचारामागे काही बाहेरच्या लोकांचा हात असू शकतो. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, शुक्रवारी जामा मशिदीबाहेर सुमारे 50 युवक असे दिसले, जे याआधी येथे कधीच दिसले नव्हते. या लोकांनी काळा कुर्ता-पायजमा आणि निळ्या टोप्या परिधान केल्या होत्या. ते चौक कारंज्याजवळ पोहोचले. मशिदीतून जमाव बाहेर येताच या लोकांनी कोल्ड्रिंक्समध्ये मद्य मिसळून प्यायले आणि या तरुणांनी नारा-ए-तकबीर, अल्लाह हू अकबर अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यानंतर इतर तरुणही त्यांच्यात सामील झाले आणि बघता बघता शेकड्यांची संख्या हजारात झाली. त्यानंतरच हिंसाचार उसळला.

दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बदमाश पूर्ण तयारीनिशी जामा मशिदीत पोहोचले होते. नमाज संपल्यानंतर त्यांनी रस्त्यावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी प्रथम त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते शांत न झाल्याने बळाचा वापर करण्यात आला. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या 48 आरोपींना अटक केली आहे. यापैकी काहींकडून चाकू आणि इतर शस्त्रे सापडली आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.