“हिंदुत्ववादी शिवसेनेचा मुस्लिम आरक्षणाचा विचार दुर्भाग्यपूर्ण, आरक्षण दिल्यास आंदोलन करु”
विश्व हिंदू परिषदेने मुस्लिमांच्या 5 टक्के आरक्षणाला कडाडून विरोध (Vishva Hindu Parishad opposes Muslim reservation) केला आहे.
मुंबई : विश्व हिंदू परिषदेने मुस्लिमांच्या 5 टक्के आरक्षणाला कडाडून विरोध (Vishva Hindu Parishad opposes Muslim reservation) केला आहे. धर्माच्या आधारावर ठाकरे सरकारने आरक्षण देऊ नये, जर आरक्षण दिल्यास आंदोलन करु, असा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिला. (Vishva Hindu Parishad opposes Muslim reservation)
हिंदुत्ववादी शिवसेना मुस्लिम आरक्षणाचा विचार करते हे दुर्भाग्यपूर्ण आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीचा असर व्हायला लागला आहे. जर राज्यात मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण दिलं, तर विश्व हिंदू परिषद आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.
5 टक्के आरक्षण
मुस्लिम समाजाला महाविकास आघाडी सरकार लवकरच गुड न्यूज देणार आहे. मुस्लिमांना शैक्षणिक संस्थांमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या संदर्भातील अध्यादेश काढणार असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी 28 फेब्रुवारीला दिली.
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार मुस्लिम समाजासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये 5 टक्के आरक्षणाचा अद्यादेश काढून कायदा तयार करणार आहे. शिवाय आरक्षण लागू करण्याबाबत सरकार विचाराधीन असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
मागील सरकारने मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी अध्येदेश काढला होता. त्याचप्रमाणे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार देखील सुप्रीम कोर्टच्या निर्देशानुसार मुस्लिम समाजासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये 5 टक्के आरक्षणाचा अध्यादेश काढून कायदा तयार करणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीसांचा आक्षेप
महाविकास आघाडीने मुस्लिम समाजाला शिक्षणात देऊ केलेल्या 5 टक्के आरक्षणावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Muslim reservation) यांनी आक्षेप घेतला आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. इतकंच नाही तर धर्माच्या आधारावर मुस्लिम आरक्षण दिल्याने मराठी आणि ओबीसी आरक्षणही अडचणीत येईल, असं फडणवीस म्हणाले.
संबंधित बातम्या
धर्माच्या आधारे मुस्लिम आरक्षण देता येणार नाही, मराठा आणि ओबीसी आरक्षण अडचणीत येईल : फडणवीस