Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election : जे इम्रान प्रतापगढी लोकसभेला 6 लाख मतांनी पडले, ते महाराष्ट्रातून राज्यसभेवर का? काँग्रेसमध्ये राहुल गांधींच्याचविरोधात सवाल

सिद्धूही इम्रानप्रमाणेच यमक आणि कविता करत असत. अशा स्थितीत पक्षात पद मिळविण्यासाठी आता कवितेकडे येणे आवश्यक आहे का? महाविकास आघाडी सरकारमध्येही काँग्रेसचे असेच नेते अपमानास्पदपणे पडून आहेत, आता पक्षाचे सर्वोच्च नेतृत्वही त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचेही या पत्रात म्हटले आहे.

Rajya Sabha Election : जे इम्रान प्रतापगढी लोकसभेला 6 लाख मतांनी पडले, ते महाराष्ट्रातून राज्यसभेवर का? काँग्रेसमध्ये राहुल गांधींच्याचविरोधात सवाल
इम्रान प्रतापगढीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 5:14 PM

नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीपूर्वी (Rajya Sabha Election) काँग्रेस पक्षात धुसफूस सुरू झाली आहे. संपूर्ण गदारोळ हा राज्यसभेच्या उमेदवारीवरून आहे. आता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य विश्वबंधू राय (Vishwabandhu Rai) यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. यापूर्वी पवनखेडा, नगमा, पृथ्वीराज चव्हाण यांनीही राज्यसभेचे तिकीट न मिळाल्याने आपली नाराजी व्यक्त केली होती. राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 10 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पक्षाने तामिळनाडूमधून पी चिदंबरम, कर्नाटकातून जयराम रमेश, छत्तीसगडमधून राजीव शुक्ला, राजस्थानमधून प्रमोद तिवारी आणि महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढी (Imran Pratapgadhi) यांच्या नावांची घोषणा केली आहे.

इम्रान प्रतापगढीवर हल्ला

राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या कोट्यातून इम्रान प्रतापगढी यांना पाठवल्याबद्दल विश्वबंधू राय यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात विश्वबंधू यांनी म्हटले आहे की, दिल्लीत बॅग आणि पलंग बाळगणाऱ्यांनाच मुख्य पदांवर नियुक्त केले जाते. विश्वबंधूंनी आपल्या पत्रात इम्रान प्रतापगढी यांच्यावर उघड निशाणा साधला आहे. मुरादाबादमधून 6 लाख मतांनी पराभूत होऊनही त्यांना अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आल्याचे लिहिले आहे.

हे सुद्धा वाचा

लायक नेत्यांकडे दुर्लक्ष व्हावे?

तर इमरान प्रतापगढ़ी जुम्मा जुम्मा चार दिवसांपूर्वी पक्षात सामील झाल्याची टीका ही त्यांनी केली. मुरादाबाद लोकसभेची निवडणूक जवळपास 6 लाख मतांनी हरली आहे. आतापर्यंत एकाही महानगरपालिकेची निवडणूक जिंकलेली नाही. तरीही त्यांना अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्षपद देण्यात आले होते.आता त्यांना राज्यसभेवर पाठवले जात आहे. तर पक्ष एका व्यक्तीवर इतका मेहरबान का? असा सवालही करण्यात येत आहे. त्यांच्या मुशायर्‍यात एवढा गुण आहे का की पक्षातील इतर लायक नेत्यांकडे दुर्लक्ष व्हावे?

कवितेकडे येणे आवश्यक आहे का?

सोनिया गांधींना पाठवलेल्या पत्रात पुढे म्हटलं आहे की, पंजाबमध्ये नवज्योत सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष बनवून अशीच चूक झाली आहे. सिद्धूही इम्रानप्रमाणेच यमक आणि कविता करत असत. अशा स्थितीत पक्षात पद मिळविण्यासाठी आता कवितेकडे येणे आवश्यक आहे का? महाविकास आघाडी सरकारमध्येही काँग्रेसचे असेच नेते अपमानास्पदपणे पडून आहेत, आता पक्षाचे सर्वोच्च नेतृत्वही त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचेही या पत्रात म्हटले आहे.

तपश्चर्येत काही कमतरता होती

राज्यसभा निवडणुकीपूर्वी आपली नाराजी व्यक्त करणारे विश्वबंधू एकटे नाहीत. यापूर्वी पवन खेडे यांनीही नाराजी व्यक्त केली होती. राज्यसभेचे तिकीट न मिळाल्यावर त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, कदाचित माझ्या तपश्चर्येत काहीतरी उणीव राहीली आहे.

काँग्रेस नेत्या नगमा

यानंतर अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा यांनी पवन खेरा यांच्या ट्विटला रिट्विट करत म्हटले की, आमची 18 वर्षांची तपश्चर्या इम्रान प्रतापगढीसमोर कमी पडली. या दोन्ही नेत्यांनी राज्यसभा निवडणुकीच्या तिकिटांच्या घोषणेवर फार काही बोलले नाही, मात्र तिकीट वाटपात दुर्लक्ष झाल्याचा संदेश त्यांनी मोजक्याच शब्दांत दिला आहे. याशिवाय महाराष्ट्रातील मुकुल वासनिक यांना राज्यसभेवर पाठवावे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केली होती.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.