पदवीधर निवडणूक : विश्वजीत कदम आणि भाजप उमेदवाराची भेट, मतदाना दिवशीच्या भेटीने भुवया उंचावल्या
कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम आणि भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांची अचानक भेट झाली. Vishwajeet Kadam
सांगली: पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे आज काँग्रेसचे नेते आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम आणि भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांची अचानक भेट झाली. पदवीधर निवडणुकीच्या मतदान केंद्राच्या बाहेरील एका कार्यकर्त्याच्या घरामध्ये दोन्ही नेते एकत्र दिसले. मतदानाच्या दिवशीच दोन विरोधी पक्षांच्या नेत्यांमधील भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मात्र, निवडणूक ही खिलाडूवृत्तीने लढवायची असते ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात आले. (Vishwajeet Kadam meet Sangram Deshmukh)
केंद्र सरकार हे लोकशाहीच्या विचाराने काम करत नसून हुकुमशाहीच्या विचाराने काम करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय सुरू आहे आणि शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचे काम सुरू आहे, असा आरोप विश्वजित कदम यांनी केला.
महाविकास आघाडीचं वर्षभरातील काम चांगलं आहे. महाविकासआघाडी सरकारचं कामकाज उत्तम आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूनं जनमत आहे, याचं भाजप नेत्यांना वाईट वाटत आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून महाविकास आघाडीचे सरकार चांगले करत असल्याचं भाजप नेत्यांना आता स्पष्ट कळून चुकले आहे.
विरोधी पक्षाचा नाइलाज झाल्यामुळे नारायण राणे यांच्यासारखे नेते उलट सुलट वक्तव्य करत आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे सरकार अस्थिर होईल असा त्यांचा गैरसमज आहे. महा विकास आघाडीचे सरकार स्थिर आणि भक्कम असून यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही, असं कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम म्हणाले. (Vishwajeet Kadam meet Sangram Deshmukh)
भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा विजयाचा दावा
भाजप उमेदवार संग्राम देशमुख यांनी विधानपरिषद निवडणुकीत विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला. पुणे पदवीधर भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. ही निवडणूक एकतर्फी होती, मोठ्या मताधिक्क्यानं विजयी होणार असल्याचा दावा संग्राम देशमुख यांनी केला आहे.
पुणे पदवीधर निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी पलूस येथे मतदान केले तर भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख हे सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मतदान केले. पुणे पदवीधर मतदार संघात 3 लाख 65 हजार पदवीधर मतदान असून 62 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत.(Vishwajeet Kadam meet Sangram Deshmukh)
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार अरुण लाड यांनी पुणे पदवीधर मतदारसंघ हा आपल्या मालकीचा आहे असं ज्या पक्षांना वाटत होतं हे चित्र मतदारांनी यावेळी बदललं आहे. सुशिक्षित आणि गावातील, शहरातील मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले आहेत. मतदार नक्कीच मला विजयी करतील, अशी आशा आहे, असं अरुण लाड म्हणाले.
पुणे पदवीधर प्रमुख उमेदवार
अरुण लाड ( राष्ट्रवादी काँग्रेस ) संग्रामसिंह देशमुख (भाजप) रुपाली पाटील ( मनसे ) शरद पाटील ( जनता दल ) सोमनाथ साळुंखे (वंचित बहुजन आघाडी ) श्रीमंत कोकाटे ( इतिहास संशोधक) डॉ.अमोल पवार ( आम आदमी पक्ष) अभिजित बिचुकले (अपक्ष)
VIDEO | Graduate Election | पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबादहून पदवीधर, शिक्षक मतदारसंघात मतदान https://t.co/ABGjBaJdS7 @BJP4Maharashtra @ShivSena @NCPspeaks @INCMaharashtra @mnsadhikrut #ElectionDay2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 1, 2020
संबंधित बातम्या:
Graduate Constituency Elections LIVE | विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकांसाठी मतदान
कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही; सुप्रिया सुळेंचा इशारा
(Vishwajeet Kadam meet Sangram Deshmukh)