पुढच्या स्ट्राईकवेळी विरोधकांनाच विमानाला बांधून नेऊ – व्ही.के. सिंह
नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायूसेनेने पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केली. या एअर स्ट्राईकमध्ये 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे. मात्र या हल्ल्यावर विरोधीपक्षांच्या नेत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. या हल्ल्याचे पुरावे मागितले, यात ठार झालेल्या 300 दहशतवाद्यांचे पुरावे मागितले. मात्र विरोधीपक्षाच्या या प्रश्नांना केंद्रीय मंत्री व्ही.के. […]
नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायूसेनेने पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केली. या एअर स्ट्राईकमध्ये 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती आहे. मात्र या हल्ल्यावर विरोधीपक्षांच्या नेत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. या हल्ल्याचे पुरावे मागितले, यात ठार झालेल्या 300 दहशतवाद्यांचे पुरावे मागितले. मात्र विरोधीपक्षाच्या या प्रश्नांना केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांनी आता सडेतोड उत्तर दिले आहे. व्ही. के सिंह म्हणाले की, ज्या विरोधकांना पुरावे हवेत त्यांनाही स्ट्राईकवेळी विमानाच्या खाली बांधून घेऊन जावे आणि तिथे सोडावे. म्हणजे ते मृतदेह मोजतील आणि परत येतील.
Union Min VK Singh: Agli baar jab Bharat kuch kare toh mujhe lagta hai ki vipakshi jo ye prashna uthate hain, unko hawai jahaz ke neeche baandh ke le jayein, jab bomb chale toh vahan se dekh lein target, uske baad unko vahin par utar dein, uske baad vo gin le aur wapas aajayein. pic.twitter.com/DsEy8bzVv8
— ANI (@ANI) March 6, 2019
“पुढच्यावेळी जेव्हा भारताला अशी कुठली स्ट्राईक करायची असेल, तेव्हा या प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधीपक्षांच्या नेत्यांनाही विमानाच्या खाली बांधून घेऊन जावे. जेव्हा बॉम्ब टाकण्यात येईल तेव्हा त्यांनी टारगेट बघून घ्यावे. त्यानंतर त्यांना तिथेच उतरवावे, म्हणजे ते मृतदेह मोजतील आणि परत येतील”, अशा खोचक शब्दांत व्ही.के. सिंह यांनी विरोधीपक्षांचा समाचार घेतला आहे. तसेच, “बॉम्ब टाकला, इमारतींना निशाणा बनवलं आणि 1000 किलेग्रामच्या बॉम्बस्फोटात लोक मारल्या गेले नाहीत? काय तुम्हाला हे मोजायचं आहे? मला नाही माहित हे कुणाला मोजायची इच्छा आहे? मात्र, हे अत्यंत निराशाजनक आहे”, असेही व्ही.के. सिंह म्हणाले.
Strongly agree sir, in logo ne desh ki ekta ko tod diya hai sharm nahi aati jo proof maang rahe hai
— Ajit Doval (@Doval_Ajit12) March 6, 2019
व्ही.के. सिंह यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनीही प्रतिक्रिया दिली. “मी तुमचे समर्थन करतो, या लोकांनी देशाच्या एकतेचे खंडण केले आहे, पुरावे मागताना यांना लाज वाटायला हवी”, अशा कडक शब्दांत अजित डोभाल यांनी विरोधकांवर टीका केली.
रात ३.३० बजे मच्छर बहुत थे,
तो मैंने HIT मारा।
अब मच्छर कितने मारे, ये गिनने बैठूँ,
या आराम से सो जाऊँ? #GenerallySaying
— Vijay Kumar Singh (@Gen_VKSingh) March 6, 2019
विरोधीपक्षांच्या भूमिकेवर नेहमीच हल्लाबोल करणाऱ्या व्ही.के. सिंह यांनी विरोधकांची खिल्ली उडवत एक ट्वीट केलं. “रात्री 3.30 वाजता मच्छर खूप आहेत, ते मी हिटने मारले. आता मच्छर किती मारले आहेत, हे मोजत बसू की झोपू?”, असे व्ही. के. सिंह यांनी आपल्यामध्ये ट्वीटमध्ये म्हटलं आहे.