Survey : मतदारांचा रोष नेमका कोणावर? केंद्र की राज्य सरकार, कोण तोफेच्या तोंडावर..

Survey : मतदारांचा रोष नेमका कोणावर अधिक असतो, केंद्र सरकार की राज्य सरकारवर..

Survey : मतदारांचा रोष नेमका कोणावर? केंद्र की राज्य सरकार, कोण तोफेच्या तोंडावर..
मतदारांचा रोष कोणावर?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 18, 2022 | 9:51 PM

नवी दिल्ली : भारतीय संघराज्याच्या (Union of India) रचनेत केंद्र आणि राज्य सरकारचे (State Government) स्थान अतिमहत्वाचे आहे. पण सध्याचे राजकारण, महागाई, समस्या पाहता सर्वाधिक रोष कोणावर दिसून येतो? केंद्र सरकारवर (Central Government) रोष निघतो की राज्य सरकारवर मतदार रोष काढतो? या प्रश्नाची उत्तरे एका सर्व्हेतून समोर आली आहेत..काय सांगतो आहे हा सर्व्हे..

2014 पासून देशात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये पक्षनिहाय संबंध ताणल्या गेल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात एकाच पक्षाचे सरकार सत्तेवर असल्यास हे संबंध ताणल्या जात नाहीत. परंतु, केंद्राच्या विरोधातील पक्षांचे सरकार राज्यात सत्तेवर असल्यास हा वाद उफाळतो.

सध्या देशातील राजकारण सरळसरळ भाजप आणि भाजपविरोधी पक्षात विभागल्या गेले आहे. 2014 नंतर हे ध्रुवीकरण झाले. 2019 नंतर मात्र हा वाद मोठ्या प्रमाणात समोर आला. अनेक राज्यात सरकार उलथवण्याचे प्रकार घडले आणि भाजपविरोधातही जोरदार हल्लाबोल वाढला आहे. मतदारांना ही गोष्ट स्पष्टपणे दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

IANS आणि C Voter ओपिनियन पोलद्वारे एक सर्व्हेक्षण झाले. त्यात केंद्र सरकार की राज्य सरकार यापैकी त्यांचा रोष नेमका कोणावर आहे, याचा उलटतपास करण्यात आला. मतदारांचा सर्वाधिक रोष नेमका कोणावर जास्त निघतो, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या सर्व्हेनुसार, 46.6 टक्के मतदार हे त्यांच्या राज्य सरकारवर नाराज आहेत. तर 34.8 मतदार हे केंद्र सरकारवर नाराज असल्याचे समोर आले आहे. या सर्व्हेनुसार, 24.6 टक्के मतदार त्यांच्या मुख्यमंत्र्यांवर तर 17.9 मतदार पंतप्रधानांवर नाराज आहेत. राज्य सरकारपेक्षा केंद्राची धोरणे आणि नीतींवर लोक अधिक नाराज आहेत.

कोविड काळात राज्य सरकारांनी केंद्र सरकारच्या एककल्ली धोरणांवर जाहीर टीका केली होती. तसेच केंद्र सरकार अनेक मुद्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप राज्यांनी केला होता. त्यानंतर केंद्रापेक्षा आता राज्यांवर मतदार नाराज असल्याचा दावा या सर्व्हेक्षणात करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.