मतदान करणाऱ्यांना सरकारवर टीका करण्याचा नैतिक अधिकार : मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra elections 2019) तारखांची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Cm Devendra Fadnavis Comment on Maharashtra elections 2019) यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

मतदान करणाऱ्यांना सरकारवर टीका करण्याचा नैतिक अधिकार : मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Sep 21, 2019 | 6:49 PM

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Poll Dates) निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra elections 2019) सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी होईल. विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra elections 2019) तारखांची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Cm Devendra Fadnavis Comment on Maharashtra elections 2019) यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री म्हणाले, “निवडणूक आयोगाने लोकशाहीच्या सर्वात मोठ्या महोत्सवाची घोषणा महाराष्ट्रामध्ये केली आहे. मी निवडणूक आयोगाचे आभार मानतो आणि या घोषणेचे स्वागत देखील करतो.”

“लोकशाहीमध्ये निवडणुकांचे एक महत्त्व आहे. कारण तो लोकशाहीचा आत्मा आहे. जनतेला आपलं सरकार निवडून देण्याचा अधिकार हा लोकशाहीने दिला आहे. आपण आपल्या सरकारकडून अनेक अपेक्षा करतो एखाद्या निर्णयावर टीकाही करतो. पण अपेक्षा करण्याचा किंवा टीका करण्याचा अधिकार जरी सर्वांना असला, तरी नैतिक अधिकार हा फक्त मतदान (Maharashtra elections 2019) करण्यासाठी जातात त्यांना आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, की प्रत्येकाने मतदानाला जावे. मोठ्या प्रमाणात मतदान करावं आणि लोकशाहीच्या महोत्सवाचा भाग व्हावं, असेही मुख्यमंत्री (Cm Devendra Fadnavis) म्हणाले.”

“त्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी निवडणुकांदरम्यान राजकीय पक्षांनी प्लास्टिकचा वापर कमीत कमी करावा. सध्या महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी आहे. निवडणूक आयोगाने केलेल्या या सूचनेचे सर्वच राजकीय पक्ष याचे तंतोतंत पालन करतील अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी (Cm Devendra Fadnavis Comment on Maharashtra elections 2019) केली आहे.”

तसेच “लोकशाहीचा महोत्सव खुल्या आणि चांगल्या वातवारणात पार पाडू असा माझा विश्वास आहे. माझ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा”, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Poll Dates) निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित केेलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा (Maharashtra Assembly Election Announcement) जाहीर केल्या आहेत. यासोबतच दोन्ही राज्यांत आदर्श आचारसंहिता 21 सप्टेंबरपासूनच लागू झाली आहे.

महाराष्ट्रातील 288 जागांसाठी एकाच टप्प्यात 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर धनत्रयोदशीच्या आदल्याच दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबरला निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी, तर हरियाणामध्ये 1.28 कोटी मतदार आहेत. राज्यात 1.84 लाख ईव्हीएम मतदान प्रक्रियेत वापरली जातील. प्रत्येक ठिकाणी पाच व्हीव्हीपॅट स्लिप मोजल्या जाणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाच्या तारखा

  • अधिसूचना जारी करण्याची तारीख – शुक्रवार 27 सप्टेंबर 2019
  • नामांकन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख – बुधवार 4 ऑक्टोबर 2019
  • अर्जाची छाननी – गुरुवार 5 ऑक्टोबर 2019
  • अर्ज मागे घेण्याची तारीख – शनिवार 7 ऑक्टोबर 2019
  • मतदान – सोमवार 21 ऑक्टोबर 2019
  • मतमोजणी – गुरुवार 24 ऑक्टोबर 2019
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.