…म्हणून थरुर हेच राष्ट्रीय अध्यक्ष व्हावेत, काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य

आज काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाचा दिवस आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आज मतदान होत आहे.

...म्हणून थरुर हेच राष्ट्रीय अध्यक्ष व्हावेत, काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य
Follow us
| Updated on: Oct 17, 2022 | 12:14 PM

मुंबई : आज काँग्रेस (Congress) पक्षासाठी महत्त्वाचा दिवस आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीवर चर्चा सुरू होती. काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असणार?, काँग्रेसचा नवा अध्यक्ष हा गांधी घराण्याबाहेरील असणार की पुन्हा एकदा गांधी घराण्यातीलच कोणीतरी अध्यक्ष होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता जवळपास चित्र स्पष्ट झालं आहे. तब्बल 37 वर्षानंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरील राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. आज काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक होत असून, त्यासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. शशी थरुर (Shashi Tharoor) आणि मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) हे काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता लवकरच काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण होणार हे स्पष्ट होणार आहे.

 ‘थरुर यांना वाढता पाठिंबा’

या निवडणुकीचा निकाल 19  ऑक्टोबरला लागणार आहे. या निवडणुकीबाबत काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी मोठं वस्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातून  शशी थरुर यांना सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होईल असं देशमुख यांनी म्हटलं आहे. निवडणुकीबाबत बोलताना देशमुख यांनी म्हटलं की, ही निवडणूक काँग्रेससाठी अतिशय महत्त्वाची आहे. मल्लिकार्जून खरगे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, ते महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. याबद्दल वादच नाही. मात्र आम्ही ज्या पद्धतीने शशी थरुर यांचा प्रचार करत आहोत, थरुर हे महाराष्ट्रात देखील आले होते. यावरून आम्हाला खात्री आहे की त्यांना राज्यातून सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होईल.

हे सुद्धा वाचा

थरुर यांना काँग्रेसमधून मोठ्याप्रमाणात पाठिंबा मिळत आहेत. गेले अनेक वर्ष काँग्रेसची महाराष्ट्रात सत्ता होती. मात्र आज काँग्रेस महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकांचा पक्ष झाला आहे. या सर्व परिस्थितीतून थरुर हेच काँग्रेसला बाहेर काढू शकतील असा विश्वास काँग्रेसच्या सदस्यांना वाटत असल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.