चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार निवडीचा वाद हायकोर्टात पोहोचला (petition filed against MLA subhash dhote) आहे. काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांनी शपथपत्रात गंभीर गुन्हे लपवल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते अॅड. वामनराव चटप यांनी केला आहे. त्यामुळे धोटे यांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान देत वामनराव चटप यांनी त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात हायकोर्टाने आमदार धोटे यांना नोटीस जारी केली असून यावर उत्तर मागितले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातील पराभूत शेतकरी संघटनेचे उमेदवार आणि माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनी आमदार सुभाष धोटे यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. सुभाष धोटे यांनी शपथपत्रात गंभीर गुन्हे लपविल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी आमदार धोटे यांच्यावर एका प्रकरणात अॅट्रोसिटीचे गुन्हा दाखल झाला होता. त्यांना 4 दिवस पोलीस कोठडीतही राहावे लागले होते, असा आरोप चटप यांनी केला आहे.
मात्र धोटे यांनी शपथपत्र आणि जाहीर प्रसिद्धीपत्रकात हे गुन्हे लपवले आहे. त्यामुळे आदिवासी समाजाच्या मतदारांची फसवणूक केली आहे असा दावाही याचिकेत चटप यांनी केला (petition filed against MLA subhash dhote) आहे.
दरम्यान या याचिका आणि नोटीसबाबत प्रसारमाध्यमांतून माहिती मिळाल्याची माहिती सुभाष धोटे यांनी म्हटले आहे. अॅड. चटप पराभव पचवू शकत नसल्याने त्यांनी हे प्रयत्न सुरु केले आहेत. योग्य वेळी आपण या नोटीशीला उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया सुभाष धोटे यांनी दिली.
या प्रकरणात धोटे यांना 13 मार्च रोजी उच्च न्यायालयात उपस्थित राहून उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. या मतदारसंघातून चटप 2501 कमी मतांनी पराभूत झाले होते. या प्रकरणी धोटे यांची आमदारकीबाबत न्यायालय काय निर्णय देते? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले (petition filed against MLA subhash dhote) आहे.