अंबरनाथ पालिकेची प्रभाग रचना जाहीर,नव्या रचनेत शहरात दोन वॉर्ड वाढले; इच्छुकांमध्ये नाराजी
अंबरनाथ नगरपालिकेची मुदत एप्रिल २०२० मध्ये संपली असून कोरोनामुळे निवडणुका होऊ न शकल्यानं दोन वर्षांपासून पालिकेवर प्रशासकीय राजवट आहे.
अंबरनाथ – नगर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा गुरुवारी जाहीर झाला. यामध्ये अंबरनाथ शहरात (ambernath city) 2 वॉर्डांची संख्या वाढली असून एकूण 29 पॅनेलच्या द्विसदस्यीय पद्धतीने आगामी निवडणुका (election) होणार असल्याचे जाहीर झाले आहे. मात्र सातत्यानं निवडणूक पुढे ढकलल्या जाण्याच्या चर्चेनं इच्छूकांमध्ये काहीसं निरुत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. पालिकेच्या निवडणुका वेळेत व्हाव्यात अशी अनेक इच्छूकांची मागणी होती, परंतु निवडणुका पुढे ढकलत असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या (corona) काळात अनेक महापालिकांच्या मुदत संपल्या होत्या. परंतु कोरोनाचा संसर्ग अधिक असल्याने निवडणुका होऊ शकल्या नाहीत. विशेष म्हणजे ओबीसी आरक्षणाचा (obc reservation) तिढा सुटेपर्यंत राज्यात पालिका निवडणुका घेण्याच्या मनस्थितीत राज्य सरकार नसल्याचं म्हटलं जातं होतं.
57 ऐवजी 59 वॉर्ड
अंबरनाथ नगरपालिकेची मुदत एप्रिल 2020 मध्ये संपली असून कोरोनामुळे निवडणुका होऊ न शकल्यानं दोन वर्षांपासून पालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. त्यात ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत राज्यात पालिका निवडणुका घेण्याच्या मनस्थितीत राज्य सरकार नसल्याचं बोललं जात होतं. मात्र निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार अंबरनाथ पालिकेनं प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर केलाय. यात अंबरनाथमध्ये 57 ऐवजी 59 वॉर्ड तयार करण्यात आले असून 29 पॅनेलच्या माध्यमातून द्विसदस्यीय पद्धतीने निवडणुका घेतल्या जाणार आहेत. 28 पॅनल हे 2 सदस्यांचे, तर एक पॅनल हा तीन सदस्यांचा असेल. या प्रारूप प्रभाग रचनेवर येत्या 17 मार्चपर्यंत पालिकेत हरकती आणि सूचना नोंदवता येणार असून त्यावर सुनावणी होऊन 2 एप्रिलच्या दरम्यान अंतिम आराखडा जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज जाहीर झालेल्या प्रभाग रचनेत अंबरनाथमधील राजकीय दिग्गजांचे प्रभाग सुरक्षित झाले असून काही प्रभागांच्या सीमा मात्र रेल्वे रूळ आणि नैसर्गिक प्रवाह ओलांडत चुकीच्या पध्दतीने तयार करण्यात आल्यानं यावर आक्षेप येण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे निवडणुका पुढे ढकलल्या
महाराष्ट्रातल्या अनेक नगरपालिकेच्या मुदती संपून वर्ष झालं आहे. परंतु कोरोनाच्या कारणामुळे तिथं निवडणूक होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे इच्छूक असलेल्या अनेक उमेदवार नाराज आहेत. सध्या अनेक नगरपंचायत प्रशासकीय पद्धतीने चालवली जात असून लवकरचं निवडणूका होतील अशी चिन्हं निर्माण झाली आहेत अंबरनाथ नगरपंचायतमध्ये दोन वार्ड वाढल्यामुळे कोणत्या पक्षाला त्याचा फायदा होणार ही सुध्दा चर्चा अंबरनाथ सुरु आहे. अंबरनाथ नगरपालिकेची मुदत एप्रिल 2020 मध्ये संपली. दोन वर्षांपासून पालिकेवर प्रशासकीय राजवट आहे.