जेव्हा काँग्रेस नेत्याला निरोप देताना मोदींनी तीनदा अश्रू पुसले, 5 मिनिटे 15 सेकंद तुम्हाला समृद्ध करतील 

राज्यसभेत आज चार खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं जे रुप पहायला मिळालं ते ऐतिहासिक आहे.

जेव्हा काँग्रेस नेत्याला निरोप देताना मोदींनी तीनदा अश्रू पुसले, 5 मिनिटे 15 सेकंद तुम्हाला समृद्ध करतील 
Narendra Modi
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 4:06 PM

नवी दिल्ली :  संसदेचं सध्या अधिवेशन सुरु आहे. दोन्ही सभागृहात भाषणांची लड सुरु आहे. पण राज्यसभेत आज चार खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Rajya Sabha Speech) यांचं जे रुप पहायला मिळालं ते ऐतिहासिक आहे. बऱ्याच काळापर्यंत ते लक्षात राहील असं आहे. एवढंच नाही तर मोदींचं संपूर्ण भाषण आपली राजकीय समज बदलणारं आहे. समृद्ध करणारं आहे. (Watch full speech of PM Narendra Modi praises Ghulam Nabi Azad gets emotional in Rajya Sabha )

मोदींना अश्रू अनावर का झाले?

राज्यसभेत आज जम्मू आणि काश्मीरच्या चार खासदारांना निरोप देण्यात आला. यात काँग्रेसचे राज्यसभेतले नेते गुलाम नबी आझाद यांचाही समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी चारही खासदारांबद्दल गौरवोदगार काढले. पण गुलाम नबी आझाद यांंचा गौरव करताना मात्र मोदी एवढे भावनावश झाले की एक वेळेस त्यांचा आवाज येणं बंद झालं. सभागृहात त्यावेळेस प्रचंड शांतता पसरली. मोदींची अशी अवस्था एक दोन मिनिटे नाही तर जवळपास पाच मिनिटं होती. मोदी आझादांबद्दल बोलत होते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. जवळपास तीन वेळेस मोदींनी अश्रू पुसले. दोन वेळेस पाणी घेत स्वत:ला सावरण्याचाही मोदींनी प्रयत्न केला. पण काँग्रेस नेत्याबद्दल बोलताना मोदींचे अश्रू थांबले नाहीत.

मोदींनी नेमकी कुठली घटना सांगितली?

आझाद यांचं काम कसं आहे याचं उदाहरण मोदींनी दिलं. ते म्हणाले की, मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो आणि आझाद हे जम्मू आणि काश्मिरचे. त्यावेळेस काश्मीरमध्ये गुजराती पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला केला. त्या घटनेनंतर आझादांनी मला फोन केला त्यावेळेस आझाद फोनवरच रडत होते. स्वत:च्या घरातला माणूस गेल्यासारखं त्यांची अवस्था होती. ते मृतदेह आणि नातेवाईकांना परत गुजरातला आणण्यासाठी रात्री एअरपोर्टवर राहिले. सकाळीही त्यांनी मला फोन केला. सगळे व्यवस्थित पोहोचले का म्हणून विचारलं. या सगळ्या प्रसंगात आझाद एखाद्या कुटुंबातल्या सदस्यासारखे वागल्याचं मोदी म्हणाले. हा पूर्ण प्रसंग सांगतानाच मोदी भावनावश झाले.

Narendra Modi Speech on Ghulam Nabi Azad – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राज्यसभेतील भाषण

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.